सानपाडा येथे शिवगाथा पोवाडे गायन स्पर्धा, वृक्षारोपण संपन्न

नवी मुंबई ः नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था, मुंबई जिल्हा कोकण विभाग तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सानपाडा येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे मावळे, सरदार, जिजामाता यांची वेशभूषा केली होती. यावेळी मुलांनी तसेच ‘संस्था’च्या महिला सदस्यांनी वीर रसाने भरलेला पोवाडा, संवाद, शिवगाथा सादर केली.

शिवजयंती निमित्त संस्था तर्फे आम्र रोपटे लावण्यात आले. या रोपट्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी ‘संस्था’च्या सर्व महिला सदस्यांनी स्विकारली. या कार्यक्रमास ‘नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था’च्या महाराष्ट्र राज्य सहसचिव आसिया रिझवी, मुंबई जिल्हा अध्यक्ष सौ. ऋतुजा रविंद्र गवस, सहसचिव सौ. सुकन्या गवस, कामोठे अध्यक्ष सौ. निशा नाईक, मुंबई सदस्य सौ.श्वेता बुधे, सौ. तृप्ती माने आदींसह सानपाडा परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, नागरिक उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विरेंद्र म्हात्रे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले’ पुरस्काराने सन्मानित