नमुंमपा सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या प्रारुप प्रभाग रचना हरकती / सूचनांवर सुनावणी संपन्न

नवी मुंबई:  नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता प्रारुप प्रभाग रचना हरकती / सूचना सुनावणी मा. राज्य निवडणूक आयोगामार्फत प्राधिकृत अधिकारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात पार पडली. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे उपआयुक्त अविनाश सणस, कोकण विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी उपआयुक्त रविंद्र जाधव, जिल्हाधिकारी ठाणे यांचे प्रतिनिधी जिल्हा सह आयुक्त संतोष देहेरकर तसेच राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव अतुल जाधव, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त  संजय काकडे, निवडणुक विभागाचे उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे, शहर अभियंता संजय देसाई हे अधिकारी उपस्थित होते.

      नमुंमपा सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता प्रारूप प्रभाग रचनेवर 3852 हरकती / सूचना प्राप्त झालेल्या होत्या. त्यावर सकाळी 9 वाजल्यापासून महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात सुरु झालेल्या सुनावणीमध्ये उपस्थित 1144 निवेदनकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घेण्यात आले. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकारी यांनी केलेल्या शिफारसी विहित नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठविण्यात येणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल तहसील कार्यालयामार्फत कुपोषित व कमी वजनाची ४७ बालकांना पोषण पोटलीचे वाटप