रायगड जिल्हास्तरिय निबंध स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न

उरण : 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून नेहरु युवा केंद्र रायगड- अलिबाग, महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे आणि वटवृक्ष सामाजिक संस्था- उलवे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली रायगड जिल्हास्तरिय खुल्या निबंध स्पर्धेचे साईनगर वहाळ येथील श्री. साई मंदिरात साई देवस्थानचे संस्थापक रविशेठ पाटील यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली विजेत्या निबंध स्पर्धकांना बक्षिस वितरण संपन्न झाले.

खुल्या गटातील निबंध स्पर्धेसाठी जिल्हातुन दोनशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेवुन प्रथम क्रमांक देविदास गणपत म्हात्रे- पेण, द्वितीय क्रमांक विद्या कुणाल श्रीश्रीमाळ - महाड, तृतीय क्रमांक अभिषेक शोभा सुरेश पाटील- पनवेल ह्या स्पर्धकांना अनुक्रमे रोख रक्कम दोन हजार रुपये, दिड हजार रुपये, व एक हजार रुपये त्याचबरोबर सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले. तर पाच उत्तेजनार्थ म्हणुन अनुक्रमे नैनिता नरेश कर्णिक- मुरुड, अभय सुनिल पालकर- माणगाव, सायराबानू वजीर चौगुले- माणगाव, राजू सीताराम पातेरे- सुधागड, आणि नयना देविदास लभडे- खोपोली या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवुन माजी राजिप सदस्य वैजनाथ ठाकुर आणि राजिप सदस्या कुंदाताई ठाकूर यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.

या स्पर्धेसाठी परिक्षण म्हणून महाराष्ट्र शासन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विद्याधर पाटील व शिक्षिका स्नेहल पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सुरुवात नाना गडकरी ह्यांच्या सुमधूर आवाजाने भक्ती संगितातून झाली तर सुत्रसंचालन जयदास ठाकूर यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील, वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी, हेमल मढवी, रोटरी क्लबचे उलवा नोड अध्यक्ष शिरीष कडू, जेष्ठ नागरीक एकनाथ मढवी, श्रीपत मढवी, सुनिल मढवी, संदेश साळुंखे, हितेश शिंगरे, अनिल पाटील, सचिन पाटील, अनिल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न