रयत शिक्षण संस्था, रायगड विभागाचा विभागीय सांस्कृतिक कार्यक्रम साजरा
नवी मुंबई : वाशी येथील मॉडर्न स्कुलमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागीय संस्कृतिक कार्यक्रम २३ मार्च रोजी संस्थेच्या पार पडला. प्रतिवर्षी ९ मे ला सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त ७ व ८ मे रोजी संस्थेच्या पाचही विभागातून विविध संस्कृतिक कार्यक्रम सादर करून त्यांना आदरांजली वाहिली जात असते. त्या निमित्त सोमवारी सांस्कृतिक कार्यक्रम निवडीची स्पर्धा झाली.
या स्पर्धेत रायगड विभागातील फुंडे, रिटघर, पडवळ पाडा, पोलादपूर, पिरकोन, वावंजे, पळस्पे, जासई, करंजा, नावडे, कामोठे, दापोली, उलवा, गव्हाण व वाशी येथील विद्यालयातील विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. वाशी येथील मॉडर्न स्कुलच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास विनायक सकपाळ (कला अकॅडमी परीक्षक, कर्मवीर विद्या प्रबोधिनी रयत शिक्षण संस्था सातारा), अमोल बोधे (कला अकॅडमी परीक्षक, कर्मवीर विद्या प्रबोधिनी, रयत शिक्षण संस्था सातारा) मोहन कोंगेरे (विभागीय अधिकारी रायगड), सुमित्रा भोसले (प्राचार्या मॉडर्न स्कुल वाशी), संतोष गुजर (वरिष्ठ लेखनिक), वैभव गावंड यांच्यासह शिक्षक व विदयार्थी उपस्थित होते.