चित्रा वाघ यांच्याकडून अर्णव खैरे कुटुंबाची भेट

कल्याण : लोकल ट्रेनमध्ये मराठी हिंदी वादातून कल्याण पूर्वेतील अर्णव खैरे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असून, या घटनेनंतर सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी ‘भारतीय जनता पार्टी'च्या महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी कल्याण पूर्वेत येऊन खैरे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. अर्णव भाषा वादाचा बळी ठरला असून तुमच्या मुलांचे राजकीय भविष्य घडवण्यासाठी मराठी मुलाचा बळी घेणार का? असा सवाल चित्रा वाघ यांनी ठाकरे बंधुंना केला आहे.

यावेळी चित्रा वाघ यांनी बोलतांना सांगितले की, फक्त हिंदीचे एक वाक्य बोलला म्हणून त्याला मारहाण केली. त्या धक्क्यातून त्याने आत्महत्या केली. भाषा संवादाचे साधन की विवादाचे साधन असा प्रश्न आहे. अर्णव हुशार मुलगा होता. त्याचा बळी घेतला, काय मिळवले असे करुन, त्या मुलाची काय अवस्था केली, त्याची काय चूक होती, याची कोण जबाबदारी घेणार? असा सवाल करत काही नेत्यांनी त्यांच्या अस्तित्वासाठी त्यांचे राजकीय भवितव्य घडवण्यासाठी जे विष पेरले त्याचा पहिला बळी अर्णव खैरे ठरला आहे, असे वाघ म्हनाल्या.

भाषा भाषांमध्ये लढवायच जे काम आहे त्यातून एका मुलाचा बळी गेला. कथित नेत्यांची मुले पार्ट्यांमध्ये जातात, तेव्हा मराठी बोलतात का. मराठी भाषेचा अभिमान मात्र दुसऱ्या भाषेचा द्वेष का करता. तो मराठी मुलगा होता. मारणारे मराठी होते यातून काय साध्य केले. ज्या परिवाराने मुलाला गमावले त्याची आई वडीलांची अवस्था बघा. एखाद्याचा जीव घेऊन मराठी अस्मिता वाढवणार का? भाषेवरचं असुरी प्रेम थांबवा, आता तरी सुधरा, असा सल्ला त्यांनी दिला.

ज्यांनी अर्णवला मारले, त्याचा बळी घेतला त्यांना पोलीस शोधतील. तुमच्या मुलांच्या राजकीय भविष्य घडवण्यासाठी मराठी मुलाचा बळी घेणार का? असा सवाल करत भाषेचे विष पेरायचे काम करतायत. भाषेवरच असुरी प्रेम थांबवलं पाहिजे. येणाऱ्या दिवसात राज्याचे मुख्यमंत्री निश्चित यांवर कारवाई करतील, असे चित्र वाघ यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘नवे शैक्षणिक धोरणः शिक्षकांसाठी संधी-आव्हाने' यावर कार्यशाळा संपन्न