‘हलत्या मुखवट्यां'द्वारे मतदान जनजागृती

पनवेल : ‘लोकसभा निवडणूक-२०२४'च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ४ हलते मुखवटे अर्थात शुभंकर (मस्कॉटस्‌) ४ प्रभागांमध्ये पुरविण्यात आले असून सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना पुढील १० दिवस या मुखवट्यांच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणी मतदार जनजागृती करण्यातबाबत आदेशित करण्यात आले आहे.

‘लोकसभा निवडणूक-२०२४'च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांची अमंलबजावणी ३३-मावळ लोकसभा मतदारसंघ मधील १८८-पनवेल विधानसभा मतदार संघ अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्र तसेच पनवेल ग्रामीण भागात केली जात आहे. महापालिका आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथक प्रमुख अधिकारी मुख्य अभियंता संजय जगताप यांच्या सुचनेनुसार महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी मतदार जनजागृती कार्यक्रम राबवित आहेत.

‘मतदान जनजागृती अभियान'चा भाग म्हणून ४ हलते मुखवटे (शुभंकर) चारही प्रभागांना पुरवण्यात आले आहेत. सदर मुखवट्यासोबत प्रत्येकी २ माणसे देण्यात आली आहे. प्रभागातील गर्दीच्या ठिकाणी या मुखवट्यांद्वारे मतदार जनजागृती करण्याबाबत प्रभाग अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले आहे. सदर उपक्रम पुढील १० दिवस राबविण्यात येणार आहे.

याचबरोबर आशा सेविकांनी सेक्टर-१,८,१३ नवीन पनवेल, भुसार मोहल्ला, कुंभार वाडा-पनवेल, सेक्टर-३ खारघर, सेक्टर- १९ कामोठे, कळंबोली, साईनगर, तळोजा पाचनंद, आसुडगांव अशा विविध ठिकाणी नागरिकांच्या बैठका घेऊन मतदान जनजागृती केली. तसेच महापालिकेच्या अधिकारी-कर्मचारी यांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवारा केंद्र-पनवेल, भीमनगर झोपडपट्टी येथे नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली. तसेच पनवेल तालुक्यातील मालडुंगे, नेरे, ऊसर्ली खुर्द, केवाळे अशा ग्रामीण भागात देखील नागरिकांना आवाहन पत्राचे वाटप करुन मतदान जनजागृती करण्यात आली. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

शिवसेना ठाकरे गटाला धक्का!