शिवसेना गोग्रासवाडी विभाग महिला आघाडीच्या वतीने महिला दिन साजरा

शिवसेना गोग्रासवाडी विभाग महिला आघाडीच्या वतीने महिला दिन साजरा

 डोंबिवली : जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना गोग्रासवाडी विभाग महिला आघाडीच्या मानपाडा रोडवरील नाना नानी पार्क येथे महिलांचा सत्कार केला. महिलांना पुष्पगुच्छ व अल्पोहार देऊन गप्पा मारल्या. शिवसेना महिला कार्यकर्त्या लीना पाटील यांच्या पुढाकाराने साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विभाग संघटक दर्शना चव्हाण, उपविभाग संघटक नंदिनी चोक, मनीषा आचरेकर, शाखा संघटक मंजुका शेट्टी. मोहिनी जाधव, मीनाक्षी खांडेकर, उपशाखा संघटक श्रुती गुप्ता, शुभांगी तांबे आणि तुलसी माली आदी उपस्थित होते. यावेळी लिना पाटील यानीं उपस्थित महिलांना सरकारी योजनांची माहिती दिली. यावेळी ज्येष्ठ महिलांनी सहभाग घेऊन पाटील यांचे कौतुक केले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

रोजगार निर्मिती नसल्याने सामाजिक न्यायाला खिंडार