तुर्भे जनता मार्केट पोलीस चौकीचे उदघाटन

नवी मुंबई : वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या उपस्थितीत तुर्भे जनता मार्केट पोलीस चौकीचे उदघाटन २३ एप्रिल रोजी करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिपक सिंगदादा, उपशहरप्रमुख आतिश घरत, व्यापारी संघटना जिल्हाप्रमुख करण दादा जैन, उपजिल्हाप्रमुख रामशेठ वाघमारे, उत्तर भारतीय जिल्हा संघटक कमलेश वर्मा, शाखा संघटक श्रद्धा गायकवाड, खजिनदार व्यापारी संघटना लक्ष्मण सिंग चौहान, शिवसेनेचे तसेच व्यापारी संघटना पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

या पोलीस चौकीमुळे येथील नागरिकांना गुन्हेगारापासून सुरक्षितता मिळण्यास सहकार्य होणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यवत केली. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘सिडको अग्निशमन दल'तर्फे अग्निशमन विषयक जनजागृती