नागरी धर्म

नागरी धर्म म्हणजे एका जबाबदार नागरिकाने समाज, राष्ट्र आणि संविधानाच्या हितासाठी जे वागणे अपेक्षित आहे, ते यात नैतिकतेचा, शिस्तीचा आणि देशभक्तीचा समावेश असतो. आपण नागरी धर्म आत्मसात करू या...आपण तसं वागू या म्हणजे आपल्या अवती-भोवती वावरणारे नक्कीच त्याच अनुकरण करतील. कारण शेवटीराष्ट्र कोणत्या लोकांनी निर्माण होते? तर विचारांवर सामाईक विश्वास असणाऱ्या लोकांचे राष्ट्र बनते. एकत्र जगण्याची उत्कट इच्छा म्हणजे एक राष्ट्र. समान धर्म, समान परंपरा, समान संस्कृती हे घटक राष्ट्राला आवश्यक ठरतात. एकत्र राहण्याची इच्छा नसल्यास मग सलग भूभाग मिळून, राजकीय सीमारेषा आखूनही एका भूभागावर दोन राष्ट्रे अस्तित्वात येऊ शकतात, जी राष्ट्रासाठी घातक ठरतात.

मी आणि माझा पुतण्या दवाखान्यात जात होतो त्याने सिग्नल तोडला. मी ओरडले, "अरे लाल सिग्नल असताना तू थांबला का नाहीस?” तर तो पटकन म्हणाला, "आजकाल सगळेच तोडतात.” जवळपास आपण सगळेजण हा अनुभव घेत असतो. गाडी चालवताना सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलणे, कारण नसताना गाडीचा हॉर्न वाजवणे, रस्त्यात थुंकूणे, रोज गाड्या धुवून पाणी वाया घालवणे. अशा कितीतरी गोष्ट आहेत. खरंच हा आपला नागरी धर्म आहे का? आपल्याला आपल्या धर्माचा विसर पडतोय. आपण नेहमी अधिकाराची चर्चा करतो, बोलण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, पण अधिकारासोबत येतात कर्तव्य आणि मानवी धर्म.

जीवनाच्या बहुतेक सर्व क्षेत्रांमध्ये यंत्र तंत्राचा शिरकाव झाला. म्हणजे माणसाचा दृष्टिकोन वैज्ञानिक बुद्धिनिष्ठ व चिकित्सक असतो असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. बहुतेक सामाजिक सार्वजनिक व्यवहार हा धर्मनिरपेक्ष तत्त्वानुसार होत असल्यामुळे नागरी जीवनात धर्माचे वर्चस्व कमी झालेले दिसते. नागरी जीवन हे वेळापत्रकानुसार आणि चाकोरीबद्ध असते. व्यक्तीच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये अनेक अनोळखी माणसाशी संबंध येतो. धार्मिक कर्मकांड व विधीनिषेध सांभाळून नागरी जीवन जगणे जवळजवळ अशक्य असते. म्हणूनही धर्माला गौण स्थान मिळाल्यासे वाटते; परंतु याचा अर्थ नागरिक समाजामध्ये धर्माला मुळीच स्थान नसते असेही नाही. असंख्य लोकांच्या समूहात वावरत असूनही व्यक्ती त्यापासून अलिप्त राहते. यामुळे व्यक्तीच्या मनावरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत धर्म किंवा देवावरील श्रद्धा ही पर्यायी म्हणून उभे राहते. मानसिक ताण कमी करणारे ते एकमेव साधन बनते. समाजामधे सर्व धर्माचे, पंथाचे लोक बहुसंख्येने असतात. त्यामुळे इतर धर्मियांबद्दल सहिष्णुता वृत्ती निर्माण होण्यास मदत होते.

आजच्या युगात केवळ अधिकारांची मागणी करून चालणार नाही. कर्तव्याची जाणीव व धर्माचे पालन करणारा नागरिकच खऱ्या अर्थाने जबाबदार नागरिक ठरतो. देशाची प्रगती, एकता, आणि शांतता टिकवण्यासाठी प्रत्येकाने आपला नागरी धर्म निष्ठेने पार पाडावा, हेच आपल्या लोकशाहीचे खरे सौंदर्य आहे.

नागरी धर्म म्हणजे काय?
"नागरी धर्म म्हणजे एका जबाबदार नागरिकाने समाज, राष्ट्र आणि संविधानाच्या हितासाठी जे वागणे अपेक्षित आहे, ते यात नैतिकतेचा, शिस्तीचा आणि देशभक्तीचा समावेश असतो.”

नागरी धर्माचे काही महत्त्वाचे पैलूः
कायद्याचे पालन करणे, कायद्याला मान देणे आणि नियमभंग न करणे.

मतदानाचा योग्य वापर करणे, मतदान हक्क म्हणजे केवळ अधिकार नव्हे, तर कर्तव्यही आहे.

स्वच्छता आणि पर्यावरणाची काळजी घेणे,  सार्वजनिक स्वच्छता राखणे, वृक्षारोपण करणे.

कर भरणे देशाच्या विकासासाठी कर भरणे ही एक नागरी जबाबदारी आहे.

सामाजिक ऐक्य टिकवणे - जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन बंधुता वाढवणे.

शासन व पोलिस यंत्रणेला सहकार्य करणे - आपत्कालीन प्रसंगी शासनाच्या सूचना पाळणे.

शाळा-कॉलेजमध्ये आणि कार्यस्थळी शिस्त पाळणे - शिस्त म्हणजेच नागरी समाजाचा पाया.

म्हणूनच आपण नागरी धर्म आत्मसात करू या...आपण तसं वागू या म्हणजे आपल्या अवती-भोवती वावरणारे नक्कीच त्याच अनुकरण करतील. कारण शेवटी राष्ट्र कोणत्या लोकांनी निर्माण होते? तर विचारांवर सामाईक विश्वास असणाऱ्या लोकांचे राष्ट्र बनते.

एकत्र जगण्याची उत्कट इच्छा म्हणजे एक राष्ट्र. समान धर्म, समान परंपरा, समान संस्कृती हे घटक राष्ट्राला आवश्यक ठरतात. एकत्र राहण्याची इच्छा नसल्यास मग सलग भूभाग मिळून, राजकीय सीमारेषा आखूनही एका भूभागावर दोन राष्ट्रे अस्तित्वात येऊ शकतात, जी राष्ट्रासाठी घातक ठरतात.  देशाच्या भूमीशी नाळ जोडलेली असणे, इतिहास आणि त्यातील घटनांबद्दल अभिमान वा खेदाची समान भावना बाळगणे आणि समान संस्कृती, पूर्वजांबद्दल समान भावना असणे अशा काही मूलभूत घटकांनी राष्ट्र बनते. राजकीय सीमांच्या पलीकडे ही संस्कृती राष्ट्राला बांधून ठेवते त्या समानतेच्या धाग्याने, एका मातृभूचे पुत्र असल्याच्या भावनेमुळे बंधुता आणि एकात्मता निर्माण होते. असे समान भावनेने प्रेरित लोक राष्ट्राला प्रगतीपथावर नेऊ शकतात. आणि हिच शिकवण आपल्याला युवा पिढीला द्यायची आहे.

धर्म के लिये जिये समाज के लिये जिये
ये धडकने ये श्वास हो पुण्यभूमी के लिये कर्मभूमी के लिये । धृ ।

गर्व से सभी कहे हिन्दु है हम एक है
जाति पंथ भिन्नता स्नेह सूत्र एक है
शुभ्र रंग की छटा सप्त रंग है लिये । १।

कोटि कोटि कन्ठ से हिन्दु धर्म गर्जना
नित्य सिद्ध शक्ति से मातृभू की अर्चना
संघ शक्ति कलियुगे सुधा है धर्म के लिये ।२।

व्यक्ति व्यक्ति मे जगे समाज भक्ति भावना
व्यक्ति को समाज से जोडने की साधना
दाव पर सभी लगे धर्म कार्य के लिये ।३।

एक दिव्य ज्योति से असंख्य दीप जल रहे
कौन लो बुझा सके आंधियो मे जो जले
तेजःपुंज हम बढे तमस चेरते हुए । ४।
-सौ.आरती राजेश धर्माधिकारी 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!