ठाणे पोलीस आयुवतपदी आशुतोष डुंबरे

ठाणे पोलीस आयुवतालय हद्दीचे भौगोलिक महत्व पाहता अनेक आव्हाने

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार नवनियुक्त ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी मावळते पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्याकडून २१ डिसेंबर रोजी स्विकारला.
ठाणे शहर विकासाचे शहर आहे. ठाणे मधील नागरिक समजूतदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असल्याने पुर्वीपेक्षा ठाणे बदलले आहे, किंबहुना ठाणे शहरात अनेक विकासकामे झाली आहेत. त्यामुळे, ठाणे म्हणजे चॅलेंजिंग टास्क आहे. ठाणे शहराची भौगोलिक रचना पाहता अनेक आव्हाने आहेत, अशी स्पष्टोक्ती नवनियुक्त ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली.

मुंबई पोलीस आयुक्तपदानंतर सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ठाणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार २१ डिसेंबर रोजी आशुतोष डुंबरे यांनी स्वीकारताना प्रारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे आणि अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.

ठाणे पोलीस आयुक्तालयात यापूर्वी पोलीस उपायुक्त ते ठाणे सहपोलीस आयुक्त या पदावर काम केलेले असल्याने त्या अनुभवाचा फायदा आता होणार आहे, असे स्पष्ट करुन ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ठाणे एक चॅलेंजिंग टास्क राहिलेला असल्याचे सांगितले.

ठाणे शहराची भोगोलिक रचना, सांस्कृतिक महत्व पाहिले असता अनेक आव्हाने आहेत. किंबहुना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असल्याने पूर्वीपेक्षा ठाणे बदलले असून, ठाणे मध्ये ठिकठिकाणी खुप मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. ठाणे भागाचा विकास झाल्याने नागरीकरण वाढले, वाहने वाढल्याने वाहतुकीची समस्या आहे. त्यावर पर्यायी मार्ग काढता येणार आहे. वाढते सायबर गुन्हे, हिंसक गुन्हे, ड्रग्ज आदी समस्यांकडे गंभीरतेने लक्ष देण्यात येणार आहे. ठाणे मधील समस्या आणि गुन्हेगारी याबाबत प्रथम माहिती घेऊन नंतर त्यावर बोलणार आहे. तत्पूर्वी दोन दिवस कामाचा आढावा घेऊन काम सुरु करण्यात येणार आहे, असे नवनियुक्त ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितले.

दरम्यान, ठाणे मधील पोलीस वसाहत आणि पोलिसांची घरे याकडे आपण विशेष लक्ष देणार आहे, असेही यावेळी ठाणे पोलीस आयुवत आशुतोष डुंबरे यांनी नमूद केले. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

बेलापूर आणि कामोठेतून 6 बांग्लादेशी नागरिकांची धरपकड