तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

नवी मुंबई -: तुर्भे विभागात अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यावर अंकुश ठेवण्यासाठी विभाग अधिकाऱ्यांनी कंबर कसली असून मंगळवार दिनांक ४ जानेवारी रोजी सानपाड आणि एपीएमसी परिसरात ८८ फेरीवाल्यांवर धडक कारवाई  करण्यात आली.

नवी मुंबई शहरात अनधिकृत फेरीवाले मोठया प्रमाणात वाढले असून हे फेरीवाले पदपथावरच ठाण मांडून बसत असल्याने पादचाऱ्यांना रस्ता काढणे कठीण होऊन बसले होते.आणि तुर्भे विभागात एपीएमसी आणि सानपाडा भागात अशा फेरीवाल्यांची संख्या मोठी आहे.त्यामुळे अशा फेरीवाल्यांवर कारवाई करावी म्हणून नागरीकांच्या तक्रारी वाढल्या होत्या.त्यानुसार विभाग अधिकारी सुबोध ठाणेकर आता एक्शन मोड मध्ये आले असुन अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा वादंग उगारला आहे. मंगळवार दिनांक ४ जानेवारी रोजी तुर्भे विभागाच्या वतीजे एपीएमसी आणि सानपाडा भागात मोठी कारवाई करण्यात आली.७ हातगाड्या व १ आईस्क्रीम टेम्पो जप्त करत ८० फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तर अनधिकृत फेरीवाल्यांवर यापुढेही अशीच धडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती तुर्भे विभाग अधीकारी सुबोध ठाणेकर यांनी दिली. यावेळी  अतिक्रमण विभागातील हेमचंद्र पाटील,गणेश निघोट ,राज नागरराजे व एपीएमसी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Read Next

मुख्यमंत्र्याविरोधात सोशल मिडीयावर पोस्ट टाकणा-या भाजपाच्या माजी नगसेविकेच्या पतीला अटक