अंमली पदार्थांची तस्करी करणारे दोन नायजेरीन नागरिक अटकेत

10 लाख 90 हजार रुपये किंमतीचे एमडी जप्त

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी सायंकाळी तळोजा येथील पेंधर फाटा येथे सापळा लावून अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन नायजेरीयन नागरिकांची धरपकड केली आहे. जुड जोनाथन आयडोको (36) व उचे प्रिता इझे (28) अशी या दोघांची नावे असुन अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांच्याजवळ असलेले 109 ग्रॅम वजनाचे तब्बल 10 लाख 90 रुपये किंमतीचे एमडी (मेफॉड्रोन) हे अंमली पदार्थ जप्त केले आहे.

 दि. 28 नोव्हेंबर रोजी रात्री दोन नायजेरियन व्यक्ती तळोजा येथील पेंधर फाटा येथे एमडी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. सदर माहितीच्या अनुशंगाने अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी, महिला पोलीस निरीक्षक मंदाकिनी चोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक कुलदिप मोरे व त्यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी तळोजा येथील कळंबोली-मुंब्रा रोडवर पेंधर फाटा येथे सापळा लावून छापा टाकला. यावेळी जुड जोनाथन आयडोको व उचे प्रिता इझे हे दोन नायजेरीयन नागरीक एमडी विक्री करताना आढळून आले.  

त्यामुळे अमंली पदार्थ विरोधी पथकाने दोघांची धरपकड करुन त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याजवळ 10 लाख 90 हजार रुपये किंमतीचे एमडी (मॅफेड्रोन) आढळुन आले. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन्ही नायजेरीयन नागरिकांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 22 (क), 29 अन्वये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. तसेच सदर गुन्हयाचा पुढील तपास तळोजा पोलिसांकडे वर्ग केला आहे.  

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

देशी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतुस बाळगणारा तरुण अटकेत