वाशी सेक्टर-8 मध्ये 15 लाखांची घरफोडी  

 15 लाख रुपये किमंतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकीस

नवी मुंबई : अज्ञात चोरटयाने बुधवारी पहाटे वाशी सेक्टर-8 मधील एका घराच्या खिडकीचे ग्रील तोडुन सदर घरातील 3 लाख रुपयांची रोख रक्कम आणि दागिने असा तब्बल 15 लाख रुपये किमंतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. वाशी पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरटया विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.  

वाशी सेक्टर-8 मध्ये प्रविण ओमप्रकाश मुरगई (72) या राहण्यास असून मंगळवारी त्या आपल्या घरात एकट्याच होत्या. रात्री 11.30 वाजता त्या जेवण करून झोपल्या या दरम्यान पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरटयाने त्यांच्या घराच्या खिडकीचे ग्रील तोडुन त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर सदर चोरटयाने मुरगई यांच्या घरातील 3 लाख रुपयांची रोख रक्कम तसेच 12 लाख रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असा एकुण 15 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. मुरगई या बुधवारी सकाळी 9 वाजता झोपेतून उठल्यानंतर त्यांच्या घरातील रोख रक्कम आणि सर्व दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वाशी पोलिसांना त्यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरटया विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन परसातील सीसीटीव्ही च्या माध्यमातून चोरट्याचा शोध सुरु केला आहे.  

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

ऐरोली येथे लोकलवर अज्ञात व्यक्तीने केलेल्या दगडफेकीत तरुण जखमी