एपीएमसीतील एमएच-43 बारवर कारवाई  

एपीएमसी सेक्टर-19 डी मधील एमएच-43 रेस्टारांट व बारवर एपीएमसी पोलिसांची  कारवाई

नवी मुंबई : नियमांचे उल्लंघन करत सुरु असलेल्या एपीएमसी सेक्टर-19 डी मधील एमएच-43 रेस्टारांट व बारवर एपीएमसी पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री छापा मारुन सदर बारमध्ये ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी अश्लील हावभाव बीभत्स वर्तन करणाऱ्या 13 महिला वेटर, 1 मॅनेजर व 4 पुरुष वेटर अशा एकुण 18 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 एपीएमसीतील पामबीच मार्गालगत असलेल्या एमएच-43 हे बार ऍन्ड रेस्टारंटमध्ये काही गिऱ्हाईक संगनमत करुन बारमधील महिला वेटर्सना अश्लिल व बिभत्स नृत्य करण्यास प्रोत्साहीत करत असल्याचे तसेच प्रिमायसेस परवान्याच्या अटींचे उल्लंघन करत असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीची शहानिशा करण्यासाठी मंगळवारी मध्यरात्री एपीएमसी पोलिसांचे पथक एमएच-43 या बारमध्ये गेले होते. यावेळी सदर बारमध्ये काही महिला वेटर या अश्लिल व बीभत्स हावभाव करत असताना दिसुन आल्या. त्यामुळे एपीएमसी पोलिसांनी बारचा मॅनेजर पाउलसामी यादवन (41), 4 वेटर आणि 13 महिला वेटर अशा एकुण 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करुन सर्वांना ताब्यात घेतले आहे.   

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अज्ञात व्यक्तीविरोधात कोपरखैरणे पोलिसात तक्रार दाखल