अज्ञात व्यक्तीविरोधात कोपरखैरणे पोलिसात तक्रार दाखल  

कोपरखैरणेत महापालिकेच्या नावाचा आणि बोधचिन्हाचा वापर करुन अश्लाध्य भाषेत बॅनरबाजी

नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर-15 ते 18 मधील उद्यानात कचरा टाकणा-यांना ताकीद देण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीने अश्लाध्य भाषेत बॅनरबाजी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर नवी मुंबई महापालिकेच्या नावाचा आणि बोधचिन्हाचा वापर करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी हा अश्लाध्य भाषेतील बॅनर परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर या बॅनरची चर्चा सुरु झाली. त्यानंतर महापालिकेने अश्लाध्य भाषेतील बॅनर काढून सदर बॅनर लावणाऱया अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे.  

कोपरखैरणे सेक्टर-15 ते 18 मधील उद्यानात बुधवारी सकाळी नवी मुंबई महापालिकेच्या नावाचा आणि बोधचिन्हाचा वापर करण्यात आलेला बॅनर झळकला. यात उद्यानात कचरा टाकल्यास कारवाई नाही तर थेट घोडा लावण्यात येईल अशी ताकीद वजा धमकी देण्यात आली होती. अश्लाध्य भाषेतील या बॅनरची कोपरखैरणे परिसरात चर्चा सुरु झाल्यानंतर महापालिकेच्या अधिका-यांनी उद्यानात धाव घेऊन सदरचा बॅनर काढुन टाकला. त्यानंतर सदरचा बॅनर महापालिकेने लावला नसल्याचे महापालिकेने जाहिर केले. तसेच महापालिकेच्या नावाचा व बोधचिन्हाचा वापर करुन त्यावर अश्लाध्य भाषेचा वापर करुन तो झळकावणा-या अज्ञात व्यक्ती विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.   

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

कोपरखैरणे मध्ये ५ रिक्षा चालकांवर कारवाई