धार्मिक श्रद्धांचा अपमान केल्याने पनवेल पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत एकाला केली अटक

एकविरा देवीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणारा व्यक्तीला सोलापुरमधून अटक  

नवी मुंबई : सोशल मिडीयावर एकविरा देवीबद्दल आक्षेपार्ह अपशब्द पोस्ट करुन धार्मिक श्रद्धांचा अपमान करणा-या शेखर उर्फ शैलेश बाळासाहेब शेंडगे (36) या व्यक्तीला पनवेल तालुका पोलिसांनी सोलापुर माळशीरस येथून अटक केली आहे. या आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली पोलिसांनी आता या गुन्हयातील दुस-या आरोपीचा शोध सुरु केला आहे.  

आगरी कोळी, कराडी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवी बद्दल इंस्टाग्रामवरुन आक्षेपार्ह अपशब्द पोस्ट केल्याप्रकरणी अनेक एकविरा देवीच्या अनेक भक्तांनी पनवेल तालुका पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. सदर पोस्ट करणाऱया व्यक्तींनी समस्थ आगरी, कोळी, कराडी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवीबद्दल सोशल मिडीयावर आक्षेपार्ह अपशब्द पोस्ट करुन धार्मिक श्रद्धांचा अपमान केल्याने पनवेल तालुका पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. तसेच पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला होता.  

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील व पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगदीश शेलकर यांच्या सुचनेप्रमाणे पोलिसांच्या पथकाने सायबर तसेच तांत्रिक तपास करुन माहिती काढली. त्यानंतर पोलिसांनी सोलापुर जिह्यातील माळशिरस येथील श्रीपुर येथे राहणाऱया शेखर उर्फ शैलेश बाळासाहेब शेंडगे याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला सोमवारी सकाळी या गुह्यात अटक केली आहे. पोलिसांनी आता या गुन्हयातील दुसऱया आरोपीचा शोध सुरु केला आहे.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

साडेबारा टक्के योजनेतील भूखंड हडप करण्याचा प्रयत्न ; खोटया सह्या केल्याचे उघडकीस