एनएमएमटी बसच्या चाकाखाली चिरुडुन तरुणाचा मृत्यू  



नवी मुंबई : करावे येथून नेरुळ गावच्या दिशेने मोटारसायकलवरुन जाणारा 17 वर्षीय अल्पवयीन तरुण रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेत उभ्या असलेल्या रिक्षावर धडकुन भरधाव एनएमएमटी बसच्या चाकाखाली आल्याने सदर तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी नेरुळ जिमखाना समोर घडली. नेरुळ पोलिसांनी या अपघाताप्रकरणी रिक्षा चालक आणि एमनएमएमटी चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

 या अपघातातील मृत विवेक शाम पटवा (17) हा करावे गावात राहण्यास होता. तसेच बेलापुर येथील शाळेत इयत्ता बारावीत शिकत होता. गुरुवारी त्याचा शेवटचा पेपर होता. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारस विवेक हा आपल्या चुलत भावाची मोटारसायकल घेऊन नेरुळ गाव येथे जात होता. यावेळी त्याची मोटारसायकल नेरुळ जिमखाना च्या गेटजवळ रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेत उभ्या असलेल्या रिक्षावर धडकली. त्यामुळे विवेक रस्त्यावर पडल्याने पाठीमागून येणा-या एनएमएमटी बसचे चाक त्याच्या डोक्यावरुन गेले. या अपघातात विवेक गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाला.  

या अपघातात विवेक पटवा हा तरुण ज्या बंद रिक्षावर धडकला, त्या रिक्षा चालकाने आपली रिक्षा सुरक्षिततेविषयी कोणतीही उपाययोजना न करता रस्त्याच्या बाजुला उभी केल्यामुळे विवेक त्याच्यावर धडकुन खाली पडल्याचे आढळुन आले आहे. त्याचप्रमाणे तो ज्या एनएमएमटी बसच्या चाकाखाली आला, त्या बस चालकाने देखील वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन बस भरधाव वेगात चालविल्याने या अपघातात विवेकचा मृत्यू झाल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे नेरुळ पोलिसांनी रिक्षा चालक आणि एनएमएमटी  बस चालक या दोघांना या अपघाताला जबाबदार धरुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नवी मुंबई न्यायालय राज्यातील पहिले डिजिटल कोर्ट