नवी मुंबई न्यायालय राज्यातील पहिले डिजिटल कोर्ट

बेलापूर न्यायालय देशातील पहिले डिजीटल न्यायालय - न्या.गौतम पटेल

नवी मुंबई :  ई-फायलिंग आणि डिजिटल कोर्टाची संकल्पना तयार केल्यानंतर या उपक्रमाला सर्वच स्तरातून विरोध झाला होता.मात्र वाशी  न्यायालयातील वकिलांनी  ई-फायलिंगची तयारी दर्शवली.त्यामुळे नवी मुंबईतील वाशी  न्यायालय हे  देशातील पहिले पेपरलेस अर्थात डिजिटल न्यायालय ठरले आहे.असे मत  मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी व्यक्त केले. वाशी न्यायालयात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यालयल सुरू  करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन पटेल यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते.

सध्या खटल्यांचा निवाडा वेगवान होणार वाढत्या खटल्यांमुळे न्यायव्यवस्थेवर कामाचा मोठा ताण पडला आहे. हा ताण कमी करण्यासाठी ई-फायलिंग आणि डिजिटल कोर्ट ही संकल्पना पुढे आली आहे. न्यायालयाचे कामकाज पूर्णपणे पेपरलेस झाल्यानंतर खटल्यांचा निवाडा जलद गतीने होणार आहे,न्यायालयाचे कामकाज पेपरलेस करण्यासाठी सध्या विशेष प्रयत्न सुरू आहेत. या संकल्पनेला सुरुवातीला विरोध झाला. मात्र बेलापूर न्यायालयाने सर्वप्रथम पेपरलेस कामकाजाची तयारी दाखवली. असेही पटेल यांनी सांगितले.

बेलापूर येथे सुरू असलेल्या वाशी दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या संकुलामध्ये आता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू झाले आहे. या न्यायालयाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या हस्ते आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या उपस्थितीत झाले. 

या ठिकाणी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू झाल्यामुळे पक्षकार आणि वकिलांचा ठाण्याची पायपीट वाचणार आहे.मार्चअखेरपर्यंत या न्यायालयात ७६२ ई-फायलिंग दाखल झाल्या आहेत. याप्रसंगी ठाणे जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश अभय मंत्री, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबईचे सत्र न्यायाधीश पराग साने, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायाधीश सूर्यकांत इंदलकर, महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे सदस्य गजानन चव्हाण, नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मोकल, पी. सी. पाटील, उपाध्यक्ष संदीप रामकर, किरण भोसले, दिनेश काळे, अक्षय काशिद, सलमा शेख, संजय म्हात्रे, समीत राऊत, अशोक साबळे, नीलेश पाटील, समीर पाटील आदी उपस्थित होते.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाशी गावातून गुटख्याचा साठा बाळगणारा व्यक्ती अटकेत