वाशीतील महापालिका रुग्णालयात अद्ययावत डायलेसीस सुविधा

नवी मुंबईकर रुग्णांना दिलासा !

नवी मुंबई ः कोव्हीड प्रभावीत कालावधीनंतर डायलेसीस करणे आवश्यक असणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्याअनुषंगाने नवी मुंबई मधील सर्वसामान्य नागरिकांना डायलेसीस सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने सकारात्मक पाऊले उचललेली असून महापालिकेच्या वाशी रुग्णालयासोबतच ऐरोली आणि नेरुळ रुग्णालयात बाह्य यंत्रणेद्वारे डायलेसीस सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या वाशी सार्वजनिक रुग्णालयात १० बेडस्‌ची डायलेसीस सुविधा आधीपासूनच उपलब्ध होती. बदलत्या तंत्रज्ञानानुसार त्यामध्ये अद्ययावत बदल करणे आवश्यक होते. सदर बाब लक्षात घ्ोत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील यांच्यामार्फत सकारात्मक कार्यवाही करण्यात येत होती. 

यामध्ये प्राईड इंडिया या सेवाभावी संस्थेच्या सहयोगाने आदित्य बिर्ला कॅपिटल या उद्योग समुहाच्या सीएसआर निधीतून वाशी सार्वजनिक रुग्णालयात असलेल्या १० बेडस्‌च्या सुविधेचे अद्ययावतीकरण करण्यात आले असून डायलेसीस मशीन आणि बेडस्‌ची अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या डायलेसीस मशीन्स आणि बेडस्‌ महापालिव्ोÀच्या वाशीतील सार्वजनिक रुग्णालयात कार्यान्वित होताना रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय गडदे तसेच आदित्य बिर्ला कॅपिटलचे मुख्य ह्युमन रिसोर्स अधिकारी सुब्रो बादुरी, सीएसआर प्रमुख गोपाल कुमार तसेच प्राईड इंडिया संस्थेच्या मुख्य कार्यवाहक इशा मेहरा आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

सदर अत्याधुनिक सुविधेमुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील डायलेसीस आवश्यक असणाऱ्या रुग्णांची चांगली सोय होणार असून याठिकाणी दिवसाला १२ रुग्णांचे हिमोडायलेसीस केले जाऊ शकते. सकाळी ८ ते सायं. ६ या वेळेत प्रतिदिन १२ अशी या डायलेसीस कक्षाची क्षमता असून याद्वारे सर्वसामान्य नवी मुंबईकर रुग्णांना दिलासा लाभला आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

‘जेएनपीए'मध्ये कांदळवनांचा नाश पर्यावरणवाद्यांची शासनाकडे तक्रार