अज्ञात चोरट्यांकडून  कळंबोली  सेक्टर-४ ई मध्ये भरदिवसा घरफोडी

कळंबोली भरदिवसा ९ लाख १२ हजाराची घरफोडी

नवी मुंबई : अज्ञात चोरट्यांनी  कळंबोली  सेक्टर-४ ई मध्ये भरदिवसा घरफोडी करुन तब्बल ९ लाख १२ हजार रुपये किंमतीचा ऐज चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे.  कळंबोली पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.

कळंबोली सेक्टर-४ई मधील एफ/१ इमारतीत सुळ  कुटुंबिय राहत असून सचिन सूळ व त्यांची पत्नी राजश्री सुळ  हे दोघेही कामाला आहेत. त्यामुळे  सोमवारी सकाळी  सचिन सुळ  हे नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेले होते. तर राजश्री यांनी सकाळी आपल्या मुलाला क्सासमध्ये तर मुलीला शाळेत सोडुन त्या आपल्या कामावर गेल्या होत्या. यादरम्यान त्यांचे घर बंद असल्याने चोरट्याने संधी साधुन त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडुन त्यांच्या घरातील सोन्याचे वेगवेगळया प्रकारचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल ९ लाख १२ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. दुपारी ३ च्या सुमारास सचिन सुळ यांचे मोठे बंधु त्यांच्या घरी गेले असताना, त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. याबाबतची माहिती त्यांनी त्यानंतर त्यांनी सचिन व राजश्री यांना दिल्यानंतर त्यांनी आपल्या घरी धाव  घेतली. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातील सर्व दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी  कळंबोली  पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

शनिवारी पहाटे वाशी सेक्टर -७ मधील रो हाऊस मध्ये १९ लाख ८५ हजार रुपयांची घरफोडी