मसाजच्या नावाखाली अनैतिक धंदे करणाऱया सीबीडीतील दोन स्पावर छापे

नुका वेलनेस स्पा व वेलनेस स्पा या दोन मसाज पार्लरवर सीबीडी पोलिसांनी बोगस ग्राहकांच्या मदतीने छापा

नवी मुंबई : मसाजच्या नावाखाली अश्लील व बीभत्स चाळे धंदे सुरु असलेल्या सीबीडी सेक्टर-11 मधील नुका वेलनेस स्पा व वेलनेस स्पा या दोन मसाज पार्लरवर सीबीडी पोलिसांनी बोगस ग्राहकांच्या मदतीने छापा मारुन दोन्ही स्पा मधुन 7 महिला व 1 स्पा चालक अशा एकुण 8 जणांना ताब्यात घेतले आहे.   

सीबीडी सेक्टर-11 मधील स्पामध्ये मसाजसाठी येणाऱया ग्राहकांकडून एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली बीभत्स व अश्लिल चाळे करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सदर स्पावर छापा मारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक पराग लोंढे, शिवाजी ढवळे व त्यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी सीबीडी सेक्टर-11 मधील एनबीसी कॉम्फ्लेक्स इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या नुका वलनेस स्पामध्ये बोगस ग्राहक पाठवुन खात्री केली. यावेळी  सदर स्पा मधील महिला या ग्राहकांसोबत अश्लील व बीभत्स चाळे करत असल्याचे आढळुन आल्यानंतर पोलिसांनी या स्पावर छापा मारुन मसाजसाठी ठेवण्यात आलेल्या तीन महिला व स्पा चालक सतिषकुमार श्रीरामसागर या चौघांना ताब्यात घेतले.  

सीबीडी सेक्टर-11 मधील हिलट सेंटर इमारतीत असलेल्या वेलनेस स्पा मध्ये देखील मसाजच्या नावाखाली अनैतिक धंदे सुरु असल्याची माहिती मिळाल्याने सीबीडी पोलिसांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी या स्पामध्ये बोगस ग्राहक पाठवुन त्याबाबत खात्री केली. या स्पामध्ये देखील एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली ग्राहकासोबत अश्लील व बीभत्स चाळे करण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या स्पावर छापा मारुन सदर स्पामध्ये मसाजसाठी ठेवण्यात आलेल्या तीन महिलांना तसेच त्यांना प्रोत्साहन देणाऱया स्पा चालक महिलेला ताब्यात घेतले. या दोन्ही स्पाच्या कारवाईत पोलिसांनी कलम 294 नुसार गुन्हा दाखल करुन पुढील कार्यवाही सुरु केली आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाशीतील मे.दुआ लिमा रिटेल, इनऑर्बिट मॉल आणि मे.क्रॉस वर्ल्ड बुक स्टोअर या स्टोअर्सवर छापे