वाशीतील मे.दुआ लिमा रिटेल, इनऑर्बिट मॉल आणि मे.क्रॉस वर्ल्ड बुक स्टोअर या स्टोअर्सवर छापे

भारतीय मानक ब्यूरोचे नवी मुंबईत छापे  

नवी मुंबई : भारतीय मानक ब्यूरोच्या मुंबई विभागाच्या पथकाने नॉन-आयएसआय, गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन करणा-या खेळण्यांची विक्री करणा-या वाशीतील मे.दुआ लिमा रिटेल प्रा.लि., इनऑर्बिट मॉल आणि मे.क्रॉस वर्ल्ड बुक स्टोअर प्रा.लि. या स्टोअर्सवर छापे मारुन लाखो रुपये किंमतीच्या खेळणी जफ्तीची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर भारतीय मानक ब्यूरोने सदर आस्थापनावर न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी कार्यवाही सुरु केली आहे. 

खेळणी गुणवत्ता नियंत्रण अध्यादेशानुसार सर्व खेळणी आयएस 9873-1 आणि आयएस 15644 अंतर्गत बीआयएस प्रमाणित असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक खेळण्यावर बीआयएस परवाना क्रमांक असलेला मानक मार्क असणे अनिवार्य आहे. असे असताना देखील वाशीतील इनऑर्बीट मॉल मधील काही स्टोअर्समध्ये गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन करुन तयार करण्यात आलेल्या खेळण्यांची विक्री करण्यात येत असल्याची माहिती भारतीय मानक ब्यूरोच्या मुंबई विभागाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे भारतीय मानक ब्यूरोच्या मुंबई विभागाचे उपसंचालक टी अर्जुन आणि सहायक संचालक विवेक रेड्डी व त्यांच्या पथकाने बुधवारी वाशीतील इनऑर्बीट मॉलमध्ये मे.दुआ लिमा रिटेल प्रा.लि., इनऑर्बिट मॉल आणि मे.क्रॉस वर्ल्ड बुक स्टोअर प्रा.लि. या स्टोअर्सवर छापे मारले.  

यावेळी सदर स्टोअर्समध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या खेळण्यांवर आयएस 9873-1 प्रमाणपत्र नसल्याचे आढळुन आले. यावरुन सदर स्टोअर्सकडुन खेळण्याच्या निर्मितीत गुणवत्ता विषयक निकषांचे उल्लंघन करुन खेळण्यांची विक्री करण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे भारतीय मानक ब्युरोच्या पथकाने या स्टोअर्समधुन लाखो रुपये किंमतीच्या खेळणी जफ्त केल्या. बीआयएस कायदा 2016 च्या कलम 17(1) नुसार अधिकृत परवाना आणि मानक मार्क नसल्यास अशा वस्तूंचे उत्पादन, आयात, वितरण, विक्री, भाडÎाने देणे, करारावर देणे, साठवणूक करणे अथवा विक्रीसाठी प्रदर्शन करणे यावर बंदी आहे.  

 

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

एमबीबीएसला ऍडमिशन मिळवून देण्याचे अमिष दाखवुन एका द्क्कुलीने 4 विद्यार्थ्यांची फसवणूक