गौतमी ब्लीस स्पामध्ये बॉडी मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

नवी मुंबई : स्पा व मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविल्या जाणाऱ्या खारघर सेक्टर-८ मधील गौतमी ब्लीस स्पावर अनैतिक मानवी वातहुक प्रतिबंधक कक्षाने शुक्रवारी सायंकाळी छापा मारुन स्पा मालक व मॅनेजर या दोन महिलांवर पीटा अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे सदर स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यसायासाठी ठेवण्यात आलेल्या ४ महिलानां देखील पोलिसांनी ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे...

खारघर सेक्टर- ८ मधील भुमी हाईट्स इमारतीतील गौतमी ब्लीस स्पामध्ये बॉडी मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी मानवी वातहुक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधख कक्षाने गौतमी ब्लीस स्पामध्ये गत शुक्रवारी सांयकाळी एक बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. यावेळी सदर स्पामध्ये वेश्याव्यवसाय चालविण्यात येत असल्याची खात्री पटल्यानंतर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने सदर स्पावर छापा मारला. यावेळी सदर स्पामध्ये बॉडी मसाजसाठी ठेवण्यात आलेल्या चार महिलांकडुन बॉडी मसाजच्या नावाखाली वेश्याव्यसाय करुन घेण्यात येत असल्याचे आढळुन आले. त्यानंतर अनैतिक मानवी वातहुक प्रतिबंधक कक्षाने सदर स्पाची मालकीण स्मिता शिवदास व मॅनेजर शेरॉन बदली या दोघींविरोधात खारघर पोलीस ठाण्यात पीटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले. तसेच ज्या महिलांच्या माध्यमातून या स्पामध्ये वेश्याव्यवसाय चालविला जात होता, त्या महिलांना देखील पोलिसांनी पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

दिशाभुल करुन एटीएममधून पैसे काढून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या भामट्याला अटक