प्रेमसंबधात अडथळा ठरणा-या पतीचा पत्नीनेच काढला प्रियकराच्या मदतीने काटा  

नवी मुंबई : नवीन पनवेल सेक्टर-18 भागात गत गुरुवारी सायंकाळी घडलेल्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात खांदेश्वर पोलिसांना यश आले आहे. या हत्या प्रकरणात मृत ओमर फारुक फकीर अहमद ब्यापारी (22) याची हत्या त्याच्याच पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने घडवुन आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलिसांनी या हत्या प्रकरणात मृत ओमरची पत्नी अस्मीरा खातुन ब्यापारी (24), तिचा बांग्लादेशी प्रियकर पफ्पु उर्फ शफीक उल अहमद (25) व त्याचे दोघे साथिदार अशा चार जणांना अटक केली आहे. न्यायालयाने या चौघांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.  

या घटनेतील मृत ओमर फारुक हा मुळचा पश्चिम बंगालमधील असुन त्याची पत्नी अस्मीरा खातुन (24) हिचा पुर्वी जहांगिर मोंडल याच्यासोबत विवाह झाला होता. त्याच्यापासुन तिला 7 वर्षाची मुलगी आहे. त्यानंतर अस्मिराने डिसेंबर 2021 मध्ये पहिल्या पतीपासुन घटस्फोट घेतल्यानंतर तीने ओमरसोबत लग्न केले होते. त्यानंतर ते दोघे रोजगारासाठी नवीन पनवेल पोदी नं.2 मध्ये आले होते. याठिकाणी ओमर हा मजुरी करुन पत्नी व मुलीसह राहत होता. तर आरोपी पफ्पु उर्फ शकील उल अहमद हा मुळचा बांग्लादेशी नागरीक असून तो देखील कामानिमित्त पनवेलमध्ये आला होता. त्याला राहण्यासाठी घर नसल्याने गत जुलै महिन्यामध्ये ओमरने त्याला आपल्या घरी काही दिवसासाठी आसरा दिला होता.  

यादरम्यान आरोपी पफ्पु व ओमरच्या पत्नीमध्ये प्रेमसंबध निर्माण होऊन त्यांच्यात अनैतिक संबध सुरु झाले होते. त्यानंतर आरोपी पफ्पुने ओमरला कायमचे सोडुन त्याच्यासोबत राहण्यास अस्मीराच्या पाठीमागे तगादा लावला होता. त्यामुळे अस्मिराने त्यांच्या प्रेमसंबधात अडथळा ठरणाऱया पती ओमरचा कायमचा काटा काढल्यानंतर त्याच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आरोपी पफ्पु याने ओमरची हत्या करण्यासाठी पश्चिम बंगाल येथून आपल्या दोन साथिदारांना बोलावुन घेतले होते. त्यानंतर या तिघांनी गत गुरुवारी सायंकाळी ओमरला नवीन पनवेल सेक्टर-18 मधील सिडको गार्डन जवळ गाठुन त्याच्या गळ्यावर, मानेवर व तोंडावर धारधार हत्याराने वार करुन त्याची हत्या करुन पलायन केले हेत.  

त्यावेळी ओमरच्या पत्नीने या हत्येच्या कटात सहभागी नसल्याचे दाखवत स्वत: खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तसेच प्रियकर पफ्पुने त्याला मारल्याचा संशय व्यक्त केला होता. खांदेश्वर पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने देखील या प्रकणाचा तपास सुरु केला होता. या तपासादरम्यान सदर हत्येच्या कटात ओमरची पत्नी अस्मीरा व तिचा प्रियकर पफ्पु या दोघांचा सहभाग असल्याचे आढळुन आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पश्चिम बंगाल येथे पळुन जाण्याच्या तयारी असलेल्या या तरीकुल महेश मंडल (19)व किताबुल अब्दुल वाहिद मंडल (27) या दोन आरोपींना पश्चिम बंगाल येथे पळुन जाण्याच्या तयारी असताना गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली. 

युनिट-2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटिल यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप गायवाकवाड, प्रविण फडतरे, पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंग्ये, मानसिंग पाटील, सुदाम पाटील आदींच्या पथकाने केली.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

गौतमी ब्लीस स्पामध्ये बॉडी मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय