क्रेझी स्टार या लेडीज बारवर पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास छापा

नवी मुंबई : नेरुळ पोलिसांनी शिरवणे गाव येथील क्रेझी स्टार या लेडीज बारवर बुधवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास छापा मारुन सदर बारमध्ये काम करणाऱया 4 बारबाला व बारचा मॅनेजर आणि वेटर अशा एकूण 6 जणांना ताब्यात घेतले आहे. सदर बार मधील महिला वेटर या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हावभाव व अंगविक्षेप करत असताना आढळुन आल्याने तसेच सदर बार मधील मॅनेजर आणि वेटर हे त्यांना प्रोत्साहन देताना आढळून आले. त्यामुळे पोलीसांनी सदरची कारवाई केली. गत जुलै महिन्यात देखील नेरुळ पोलिसांनी या बारवर अशाच प्रकारची कारावाई केली होती.      

शिरवणें गाव सेक्टर-1 मध्ये असलेल्या क्रेझी स्टार या लेडीज बारमध्ये काम करणाऱया महिला ग्राहकांसोबत अश्लिल चाळे करुन अश्लिल वर्तन करत असल्याची माहिती नेरूळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उप निरीक्षक सचिन ढगे व त्यांच्या पथकाने बुधवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास साध्या वेशात जाऊन त्याबाबत खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सदर बारवर छापा मारला. यावेळी सदर बारमध्ये काम करणाऱया महिला ग्राहकांसोबत शारीरिक लगट व अंगविक्षेप करुन बीभत्स वर्तन करताना आढळुन आल्या. तसेच बारचा मॅनजर कमल परिहर (35) व वेटर सुनिलकुमार रवानी (25) हे दोघे बारमध्ये काम करणाऱया महिलांना प्रोत्साहित करताना आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी सदर बारमध्ये काम करणाऱया 4 महिलांसह बारचा मॅनेजर आणि वेटर अशा एकुण 6 जणांविरोधात 294 व महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन सगळ्यांना ताब्यात घेतले आहे.     

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

खारघर पोलिसांच्या तावडीतून बांग्लादेशी आरोपीचे पलायन