कळंबोलीतून 5 वर्षाच्या मुलासह महिला बेपत्ता

विवाहिता आपल्या 5 वर्षाच्या मुलासह गत 2 जुन रोजी बेपत्ता ; कळंबाेलीत खळबळ

नवी मुंबई: कळंबोली सेक्टर-14 मधील सुमुख को.ऑप. हाऊसिंग सोसायटीत राहणारी विवाहिता आपल्या 5 वर्षाच्या मुलासह गत 2 जुन रोजी बेपत्ता झाली आहे. या दोघांचा अद्याप ठाव ठिकाणा न लागल्याने कळंबोली पोलिसांनी बेपत्ता झालेली महिला व तिचा मुलगा या दोघांच्या मिसींगची तक्रार नोंद करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. 

या घटनेतील बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव मिनाक्षी श्याम जैस्वार/आझाद (32) तर तिच्या मुलाचे नाव पियुश श्याम जैस्वार/आझाद (5वर्षे 6 महिने) असे आहे. हे दोघेही कळंबोली सेक्टर-14 मधील सुमुख को-ऑप हाऊसिंग सोसायटीत राहत होते. गत 2 जुन रोजी मिनाक्षीचा पती श्याम जैस्वार हा कामावर गेला असताना, घरामध्ये आपल्या मुलसाह असलेली मिनाक्षी जैस्वार ही आपल्या 5 वर्षीय मुलाला घेऊन दुपारच्या सुमारास घरातुन निघुन गेली. सायंकाळी श्याम जैस्वार घरी आल्यानंतर घरात मिनाक्षी व मुलगा पियुश निदर्शनास न आल्याने त्याने सर्व नातेवाईक व त्याच्या मित्रांकडे शोध घेतला. मात्र ते कुठेच सापडले नाहित.  

अखेर श्याम जैस्वार यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात मिनाक्षी व पियुश हे दोघे हरविल्याची नोंद केल्यानंतर पोलिसांनी बेपत्ता झालेल्या या माय लेकाचा शोध सुरु केला आहे. यातील मिनाक्षी जैस्वार हिचा वर्ण गोरा असून तिची उंची 5 फुट 3 इंच इतकी असून ती सडपातळ आहे. तिने अंगावर फिकट हिरवट रंगाची सलवार व काळ्या रंगाची लेगीस  घातली आहे. तर पियुश जैस्वार याचा वर्ण गोरा असुन त्याची उंची 3 फुट 6 इंच इतकी असून तो देखील सडपातळ आहे. त्याच्या अंगात केसरी रंगाचा टी-शर्ट व पांढऱया रंगाची जीन्स घातलेली आहे. या वर्णनाची महिला व मुलगा कुणाला आढळुन आल्यास त्याबाबतीची माहिती तत्काळ कळंबोली पोलिसांना द्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पनवेल रेल्वे स्थानकात अल्पवयीन तरुणावर ब्लेडने वार करुन लुट