पनवेल रेल्वे स्थानकात अल्पवयीन तरुणावर ब्लेडने वार करुन लुट  

नवी मुंबई : पनवेल रेल्वे स्थानकात मोठया भावाची वाट पहात बसलेल्या एका 16 वर्षीय तरुणावर दोघा लुटारुंनी ब्लेडने वार करुन रोख रक्कम व मोबाइल फोन असलेली बॅग लुटून पलायन केल्याची घटना मंगळवारी पहाटे पनवेल रेल्वे स्थानकात घडली. या पनवेल रेल्वे पोलिसांनी या प्रकरणातील दोघा लुटारुं विरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

या घटेनत जखमी झालेला शंकर अर्जुन पाटील (16) हा माथेरान येथे राहण्यास असून तो शर्यतीचा घोडा चालविण्याचे काम करतो. मंगळवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास शंकर हा आपला मोठा भाऊ दशरथ याच्यासोबत घोडा खरेदी करण्यासाठी माथेरान येथून टॅक्सीने पनवेल येथे आला होता. यावेळी दशरथ नेरुळ येथे टॅक्सीने गेला तर, शंकर पनवेल रेल्वे स्टेशनवर दशरथची वाट पाहत बसला होता. यावेळी रेल्वे स्थानकावर  शंकर एकटाच असल्याची संधी साधुन दोघा लुटारुंनी त्याच्याजवळ असलेली रोख रक्कमेची बॅग लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी शंकरने त्यांना विरोध केल्याने एका लुटारुने त्याच्या हातावर ब्लेडने वार करुन त्याचा मोबाइल व बॅग लुटून स्थानकातून सुटलेल्या लोकलेमध्ये चढून दुसऱया बाजूला उतरुन पलायन केले. यावेळी शंकरने जखमी अवस्थेत त्या दोघा लुटारुंचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र दोघे लुटारु त्याच्या हाती लागले नाहीत. त्यानंतर शंकरने रेल्वे पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर त्याला पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पनवेल रेल्वे पोलिसांनी शंकरने दिलेल्या तक्रारीवरुन दोघा लुटारुंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

एपीआय अश्विनी बिद्रे यांच्या हत्येच्या दिवशी एकत्रच मिरा-भाईदर मधील फ्लॅटपर्यंत गेल्याचे मोबाईल लोकेशन