बेकायदा बांधकामे; संकटाला आमंत्रण
नवी मुंबई महापालिका अथवा सिडको प्रशासनाची कोणतीही पुर्वपरवानगी न घता नवी मुंबई शहरामध्ये करण्यात येणारी अनधिकृतपणे बांधकामे भविष्यात संकटाला आमंत्रण देणारी ठरणार आहेत. एकीकडे महापालिका प्रशासनाची कोणतीही पुर्वपरवानगी न घता करण्यात येणारी अनधिकृत बांधकामे तोडण्याची कारवाई महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत असली तरी दुसरीकडे नवी मुंबई शहरामध्ये बेकायदा बांधकामे उभारण्याचे भूमाफीयांचे उद्योग काही थांबले असल्याचे चित्र दिसत नाही. नवी मुंबई शहरात महापालिका प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अनधिकृत करण्याचे सत्र बिनबोभाटपणे सुरुच आहे. नवी मुंबई शहरामध्ये नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घत भूमाफिया अनधिकृत इमारतींचे इमले रातोरात उभारत आहेत. नवी मुंबईमध्ये सध्या ‘कोरोना’च्या वेगाने अनधिकृत इमारती बांधण्याचे काम भूमाफिया पूर्णत्वास नेत आहेत. मात्र, बेकायदेशीर इमारती बांधताना भूमाफिया स्वार्थापोटी वाहनतळाची व्यवस्था इमारतीच्या तळमजल्यावर करत नसल्याने नवी मुंबई महापालिका हद्दीतील अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये वाहन पार्कींग करण्यावरुन मोठ्या प्रमाणात खटके उडत असल्याच्या घटना नियमितपणे घडत आहेत. त्यामुळे, अनधिकृत इमारतीत घरे घणाऱ्या नागरिकांवर आता रोजच भांडणे ऐकण्याची वेळ आली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या ‘कोरोना’च्या प्रादुर्भावात महापालिका प्रशासन ‘कोरोना’ला अटकाव करण्यात गुंतल्याने भूमाफियांना आयतेच मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळे जलदगतीने अनधिकृत इमारती बांधल्या जात आहेत. विशेष म्हणजे अनधिकृत इमारतीत घरे घण्यासाठी नागरिकांचा प्रतिसादही चांगला आहे. इमारतीत घर घणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडे किमान दुचाकी वाहन तर असतेच असते. मात्र, अनधिकृत इमारतीत वाहनतळसाठी भूमाफिया जागा ठेवत नसल्याने अनधिकृत इमारतीत घर घणाऱ्या वाहनधारकांना ‘वाहन पार्कींग करायचे कोठे?’, असा प्रश्न सतावत आहे. इमारतीमध्ये वाहनतळ नसल्याने रहिवाशी दिसेल त्या मोकळ्या जागेत वाहन उभे करतात. मोकळी जागा नसल्यावर इमारती मधील रहिवाशी रस्त्याच्या दुतर्फा देखील वाहने अवैधपणे उभी करत आहेत.यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा प्रश्न जटील होत चालला आहे. काही रहिवाशी त्यांची वाहने उभी करण्याची जागा फिक्स करत असतात. त्या जागेवर दुसऱ्या कुणी वाहन उभे केले तर मारहाण, भांडणासारखे प्रकार नेहमीच घडत आहेत. सध्या पार्कींगचा प्रश्न मोठा झाला असताना अजूनही नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती उभ्या राहत आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सिडको, एमआयडीसी, वन विभाग हद्दीतील भूखंडावर आणि चाळींच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचा सिलसिला चालू आहे. नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात होणारी अनधिकृत बांधकामे रोखायची कोणी?. अनधिकृत बांधकाम होतानाच त्यावर कारवाई झाली तर ते तोडण्याची वेळही येणार नाही. पण, लक्षात घतो कोण?.