योग्य लसीकरण

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना बाधीतांच्या संख्येत मागील काही दिवसांमध्ये घट होताना दिसत असले, ‘कोव्हीड’ची तिसरी लाट ओसरल्याचे चित्र पहायला मिळत असले तरी कोव्हीड अजून संपलेला नाही, याची जाणीव ठेवून प्रत्येक नागरिकाने चेहऱ्यावर ‘मास्क’चा नियमित वापर, सुरक्षित अंतर आणि कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करण्याची नितांत गरज आहे. याबाबत महापालिकेद्वारे जनजागृती केली जात असताना नागरिकांनी ‘कोव्हीड’कडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. महापालिका क्षेत्रात १८ वर्षावरील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले असल्याने कोरोना बाधीतांची संख्या ४ हजारार्पयंत पोहचूनही रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण मर्यादित होते. त्यामुळे तिसऱ्या लाटेची तीव्रता तितकीशी जाणवली नाही. महापालिकेने लसीकरणाचे योग्य नियोजन करुन १०२ लसीकरण केंद्रे सुरु केल्याने कोव्हीड लसीच्या पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करणारी नवी मुंबई महापालिका पहिली महापालिका होती. लसीकरणाचा वेग कायम राखत महापालिकेने दुसऱ्या डोसचेही लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होऊन नागरिक लस संरक्षित व्हावेत याकडे विशेष लक्ष दिले. महापालिकेने १०,९३,३४१ नागरिकांना कोव्हीड लसीचे दोन्ही डोस दिलेले असून, ९८.७६ टक्के नागरिक पूर्णतः लस संरक्षित झालेले आहेत. १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाप्रमाणेच १५ ते १८ वयोगटातील कुमारांच्या पहिल्या डोसचेही १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले असून, त्यांच्या दुसऱ्या डोसचेही लसीकरण गतीमानतेने पूर्ण करुन घण्यात येत आहे. महापालिकेने दुसऱ्या डोसच्या लसीकरणाचेही सुव्यवस्थिती नियोजन केले असून, २३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ४ रुग्णालये, वाशी मधील इएसआय रुग्णालय, एपीएमसी मार्केटमधील दाणा बाजार, भाजी मार्केट तसेच जुईनगर रेल्वेकॉलनी आरोग्य केंद्र याठिकाणी दुसऱ्या डोसची कोव्हीशिल्ड लसीकरण सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय ४ महापालिका रुग्णालये आणि इएसआय रुग्णालय येथे कोव्हॅक्सिन लसीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. १५ ते १८ वयोगटातील कुमारवयीन मुले-मुलींच्या दुसऱ्या डोससाठी शाळांमध्येही लसीकरण केंद्रे सुरु क़रण्याचे नियोजन करण्यात येत आहे. याशिवाय दुस-या डोससाठी पात्र असणा-या लाभाथ्र्यांर्पयंत लसीकरण आपल्या दारी या विशेष मोहिमेअंतर्गत  पोहचून दुसऱ्या डोसच्या लसीकरणाचा वेग वाढविला जात आहे. याकरिता प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र पातळीवर ७८७ पथके कार्यरत असून, या पथकांद्वारे गृहभेटी लाभाथ्र्यांना लसीकरणासाठी कार्ड वाटप करण्यात येत आहेत. याबरोबरच ६० वर्षावरील नागरिकांनी तिसरा प्रिकॉशन डोस घण्यासाठीही विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत असून, महापालिका क्षेत्रात दररोज होणाऱ्या प्रिकॉशन डोसच्या लसीकरणातील लाभार्थी मानकऱ्यांचे छायाचित्र महापालिकेच्या विविध समाज माध्यमांवरुन प्रसारित करण्यात येत आहे. त्यामुळे प्रिकॉशन डोसच्या लसीकरणालाही वेग आला असून दररोज ५५० र्पयंत ज्येष्ठ नागरिक प्रिकॉशन डोसचा लाभ घताना दिसत आहेत. एकूणच ‘कोव्हीड’चा लाट ओसरताना दिसत असली तरी कोव्हीड अजून संपलेला नाही याची जाणीव ठेवून प्रत्येक नागरिकाने कोव्हीड लसीच्या दुसऱ्या डोसची तसेच प्रिकॉशन डोसची वेळ आल्यानंतर त्वरीत महापालिका लसीकरण केंद्रांमध्ये जाऊन विनामुल्य लसीकरण करुन घऊन नागरिक कोव्हीड लस संरक्षित होण्यासाठी महापालिका करीत असलेले प्रयत्न स्वागतार्ह आहेत. कोव्हीड लस संरक्षित होण्यासाठी महापालिका द्वारे चांगली सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेचा फायदा घऊन कोव्हीड लस संरक्षित होणे नागरिकांच्याच हिताचे आहे. 

Read Previous

 कोविड संरक्षित होण्याची संधी 

Read Next

त्रासदायी वाहतुक काेंडी