कोविड संरक्षित होण्याची संधी 


मागील आठवड्याभरापासून नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कोविड बाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत असून, गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधितांची दैनंदिन वाढती संख्या तसेच ‘ओमायक्रॉन’चे सावट लक्षात घऊननवी मुंबई महापालिका तपेÀ महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ३ जानेवारी पासून राबविण्यात येणारी १५ ते १८ वयोगटातील मुले-मुलींसाठी विशेष कोविड-१९ लसीकरण मोहीम नवी मुंबई शहरातील १५ ते १८ वयोगटातील मुले-मुलींना आणि त्यांच्या पालकांना मोठाच दिलासा देणारी आहे. महापालिका द्वारे १५ ते १८ वयोगटातील मुले-मुलींना नवी मुंबई शहरातील त्यांच्या शाळा आणि कॉलेज मध्ये जाऊन कोविड लसीकरण करण्यात येत असल्याने १५ ते १८ वयोगटातील मुले-मुलींचा कोविड लस घण्यासाठी महापालिका रुग्णालय अथवा लसीकरण केंद्रामध्ये जाण्याचा त्रास वाचणार आहे. अर्थात १५ ते १८ वयोगटातील मुले-मुलींचे कोविड लसीकरण करण्याची मोहीम येत्या १० जानेवारी र्पयंतच राबविण्यात येणार असल्याने १५ ते १८ वयोगटातील मुले-मुलींनी देखील या मोहीमेत त्वरीत लसीकरण करुन घण्याची गरज आहे. कोविड मोहीम प्रभावी रितीने राबविण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आरोग्य विभाग तपेÀ लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याने १५ ते १८ वयोगटातील मुले-मुलींना मोठाच फायदा होणार आहे. महापालिका द्वारे शासन निर्देशानुसार ‘कोविड लसीकरण आपल्या शाळा-कालेजमध्ये’ या विशेष लसीकरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. महापालिका आरोग्य विभाग तपेÀ नवी मुंबई शहरातील २०६ शाळा-कॉलेज मध्ये कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. महापालिका नागरी आरोग्य केंद्रामार्फत शाळा-कॉलेज मध्येच कोविड लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे १५ ते १८ वयोगटातील मुले-मुलींना कोविड लसीकरणाची माहिती संबंधित शाळा-कॉलेज द्वारे देण्यात येत आहे. शासन निर्देशानुसार महापालिका तपेÀ विशेष लसीकरण मोहीमेद्वारे १५ ते १८ वयोगटातील मुले-मुलींना कोविड संरक्षित होण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्वरित कोविड लसीकरण करुन घणे १५ ते १८ वयोगटातील मुले-मुलींच्या हिताचेच आहे. 

Read Next

जलसाक्षरता चळवळीची आवश्यकता