कल्याण ट्रॉफी स्केटींग स्पर्धेत स्केटलाईफ स्पीड स्केटींग ॲकॅडमी विजेते

कल्याण : स्केटिंग असोसिएशन ऑफ कल्याण तालुका आणि रिजन्सी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रिजन्सी ॲन्टालिया शहाड येथे ७ वी कल्याण ट्रॉफी खुली स्केटींग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ‘मिरा-भाईंदरच्या ‘स्केटलाईफ स्पीड स्केटींग ॲकॅडमी'ने ७२ गुण घेत स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावले. तर बदलापूर मधील  ‘इंडियन स्कूल ऑफ स्केट क्लब'ने ६८ गुणांसह स्पर्धेच्या उपविजेतेपदाचा मान मिळवला. तर कल्याणच्या ‘सागर वलब'ने तृतीय स्थान पटकावले.

सर्व विजेत्या संघाना कल्याण ट्रॉफी आणि खेळाडुंना सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत मुंबई विभागामधून २४६ खेळाडुंनी सहभाग घेऊन स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला. स्पर्धा ‘स्केटींग'च्या ५ विविध प्रकारात खेळवण्यात आली. ‘स्पर्धा'चे उद्‌घाटन ‘रिजन्सी ग्रुप'चे मनिष रुपचंदानी यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले. याप्रसंगी पप्पू सैनी, रफिक शेख, मोहित बजाज, गितेश वैद्य आणि मनिषा गावकर उपस्थित होते. स्पर्धेला पालकांनी मोठा प्रतिसाद दिला.

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रफिक अन्सारी, गणेश बागुल, संतोष मिश्रा, सागर कुलदीप, मितेश जैन, आयप्पा नायडू, गुफ्रान शेख, तानिया भाटिया, अथर्व गावकर, दीपक कुलदीप यांनी परिश्रम घेतले.

अन्विता बुटे, जैस्वी नायर, मोहममद इब्राहीम शेख, जियाना शेट्टी, अर्जुन कामत, आध्या कामत, रेवा खेडेकर, पारथी परमार, देवांश प्रधान, रुद्रांश दास, हर्षिका विवेक रस्तोगी, अजीता जियाल, चाहत मुकेश पाइन या खेळाडुंनी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. प्रजना पाइन, फराझ अन्सारी, प्रेक्षा टेकरीवाल, जियान प्रजापती, रेयांश गायकवाड, राफे काझी, अद्वैत दळवी, टि्‌वशा जव्हेरी, जिया जियाल, दव विश्वकर्मा, अर्जित जोयशी, गोहिल शौर्य, सॅम जॉर्ज, करुण्या पतंगे यांनी रौप्य पदक तर सिध्देश भोसले, दिव्यांश जियाल, कावेश  दत्ता, आकृति झा, झैन काजी, अरमान सय्यद,  ध्रुविका रावराणे या खेळाडुंनी कास्य पदक पटकावले.

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

 मतदान जनजागृतीसाठी ‘मिनी मॅरेथॉन'चे आयोजन