द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

द्रोणागिरी विद्यालयात विद्यालयात शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने उरण तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन

उरण : उरण तालुक्यातील करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम द्रोणागिरी विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा बुधवार ( दि. ८ ) रोजी  विद्यालयात शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने उरण तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या कुस्ती स्पर्धांचे उद्घाटन करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन भालचंद्र शांताराम कोळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी स्कूल कमिटीच्या चेअरमन, गीताताई भगत, कारंजा मच्छीमार सोसायटीचे सदस्य देवेंद्र कोळी, सदस्या हर्षदाताई कोळी व इतर मान्यवर उपस्थित होते.

       या सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.प्रभू मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.आपल्या स्वागतपर भाषणात प्रभू मॅडम यांनी सर्व स्पर्धकांना कुस्ती खेळाविषयी आणि स्पर्धांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.या स्पर्धा पार पाडण्यासाठी तालुका क्रीडा समन्वयक टेमकर सर यांनी विशेष मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन केले.

        या स्पर्धांमध्ये 14,17, आणि 19 वर्ष वयोगटातील मुले आणि मुलींनी सहभाग घेतला होता.या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर सर्व विजयी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रभू मॅडम, पाटील सर, सोनाली मॅडम, टेमकर सर आणि इतर सर्व शिक्षकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

   विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना श्री.टेमकर सरांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांची आणि सर्व क्रीडा शिक्षकांची चांगली व्यवस्था केल्याबद्दल शाळेच्या आयोजकांचे विशेष आभार मानले.त्याचप्रमाणे शाळेची शिस्त अतिशय चांगली असल्याचे सांगितले.
      स्पर्धांसाठी इतर सर्व शाळांपेक्षा या शाळेत अतिशय चांगली व्यवस्था करण्यात आली होती असे सांगितले.
        या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर , सर्व शाळांतील शिक्षक, सर्व स्पर्धक विद्यार्थी , सर्व व्यवस्था करणारे शिक्षक यांचे विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.डी.सी.पाटील सर यांनी आभार मानले.

Read Next

नवी मुंबई महापालिका जिल्हास्तरीत शालेय क्रीडा स्पर्धेत २३४ शाळा सहभागी