"निर्णय तुमचाच जबाबदारीही तुमचीच" संदेशाने "रस्ता सुरक्षा अभियान-२०२४"चा शुभारंभ

ठाणे :  "निर्णय तुमचाच जबाबदारीही तुमचीच" या संदेशासह सोमवारी ठाण्याच्या टिपटोप प्लाझा येथे ठाणे वाहतूक शाखेचा रस्ता सुरक्षा अभियान-२०२४ चा  शुभारंभ ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करीत संपन्न झाला. 
 
   ठाणे शहर वाहतूक विभागाच्या वतीने शुभारंभ करण्यात आलेल्या रस्ता शूरक्षा अभियान-२०२४ हा १५ जानेवारी, २०२४ ते १४ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत साजरा होणार आहे. या कार्यक्रमा प्रसंगी रस्ता सुरक्षेचे महत्व आणि वाहतूक नियमांचे पालन करणे अडीच्या संदेशासह  "निर्णय तुमचाच जबाबदारीही तुमचीच" या ब्रीद वाक्यासह एका व्हिडोओ चे अनावरण करण्यात आले. रस्ता सुरक्षा अभियानामध्ये रस्ता सुरक्षेचा संदेश नागरिकापर्यंत परिणामकारक पोहचण्यासाठी विविध शाळा, कॉलेज या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेमधून पोलीस आणि नागरिक यांमधील संवाद अधिक दृढ व्हावा व रस्ता सुरक्षेबाबत सर्व अधिक जागरूक आणि दक्ष राहावे हा उद्देश आहे. 
 
        ठाणे शहर वाहतूक विभागाच्या वतीने सोमवारी शुभारंभ करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियान-२०२४ च्या कार्यक्रमाला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर, सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, अप्पर पोलिस आयुक्त प्रश्चिम प्रादेशिक विभाग महेश पाटील, भाजप आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 

 

 
Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

बिल्डरच्या हत्येचा छडा