'स्कूल व्हॅन'ने  घेतला अचानक पेट 

स्कूल व्हॅनने अचानकपणे पेट घेतल्याने नवीन पनवेल परिसरात धावपळ

पनवेल : गाडी मध्ये सी एन जी गॅस भरून पेट्रोल पंपाच्या बाहेर पडून काही अंतर पुढे गेलेल्या स्कूल व्हॅनने अचानकपणे पेट घेतल्याने परिसरात धावपळ उडाली. सदर घटना ५ जुलै रोजी दुपारी घडली आहे . 

नवीन पनवेल उड्डाणपुलाखाली असलेल्या कांडपिळे सी एन जी पंपामध्ये ५ जुलै रोजी दुपारी पाऊणे तीनच्या सुमारास स्कूल व्हॅन (क्रमांक- एम एच- ४६- जे -०३०१) घेऊन चालक गॅस भरण्यासाठी गेला.  त्यानंतर सदर गाडी बाहेर काढून चालक थोडा पुढे गेला असता अचानक गाडीने पेट घेतला. यावेळी परिसरातील नागरिकांनी सदर ठिकाणी धाव घेऊन अग्निशमन दलाला घटनास्थळी प्राचारण केले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.  या आगीमध्ये गाडीचे मोठे नुकसान  झाले आहे. आग कशा मुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही आहे . 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

खंडणीसाठी सहकामगाराच्या मुलाचे अपहरण करणारा खंडणीखोर पोलिसांच्या जाळ्यात