चोरट्याने वाशीत वकिलाचे घर फोडले, वकिलाच्या घरात सव्वा लाखाची घरफोडी

नवी मुंबई :  अज्ञात चोरट्याने वाशी सेक्टर-३१ भागात राहणाऱया एका वकिलाचे घर फोडून त्यांच्या घरातील सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरुन  नेल्याचे उघडकिस आले आहे. वाशी पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरट्या विरोधात  घरफोडीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.  

वाशी सेक्टर-३१ मध्ये वकिल अंकुश गायकवाड कुटुंबासह राहण्यास असून गत १२ जून रोजी गायकवाड यांचे चुलत बंधु मधुकार गायकवाड यांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी अंकुश गायकवाड हे कुटुंबासह गावी सोलापुर येथे गेले होते. यादरम्यान अंकुश गायकवाड यांचे घर बंद असल्याने चोरट्याने संधी साधुन १८ जुन रोजी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून त्यांच्या घरातील रोख रक्कम आणि दागिने असा सुमारे सव्वा लाख रुपये किंतमीचा ऐवज चोरुन नेला.  

सदर प्रकार त्यांच्या शेजाऱयांना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गायकवाड यांना संपर्क साधुन याबाबतची माहिती दिली. त्यानंतर गायकवाड दुसऱया दिवशी पहाटे वाशीत दाखल होऊन त्यांनी आपले घर गाठले असता, त्यांच्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वाशी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन चोरटयाचा शोध सुरु केला आहे.

Read Previous

लॉरेम इप्सम म्हणजे काय?

Read Next

कळंबोलीतून 5 वर्षाच्या मुलासह महिला बेपत्ता