मुशाफिरीः राजेंद्र घरत

पुस्तक, कागद, लेखणी, शस्त्र, चित्रफित, गाणी, नाटक, सिनेमा, अन्य सादरीकरणे ही तर केवळ साधने-माध्यमे आहेत. सुरीने कांदा कापता येतो व एखाद्याची मानही! तिचा वापर कसा होतो हे बघावे! तोफांची सलामी देऊन देशभक्तांना वंदन करता येते व युक्रेनसारख्या ठिकाणी मानवी वस्त्यांवर तोफगोळे डागून स्त्रिया, मुले, कध्द, रुग्ण यांचे जीवही कसे घता येतात हेही आपण पहात आहोतच. 

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटीश पोलीसांचे अनन्वित अत्याचार सोसले. फाशीच्या शिक्षांना आपले देशभक्त सामोरे गेले. आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी तुरुंगाची वाट धरली. ते तुरुंग, त्या छळछावण्या पहायला आजही भारतवासी गर्दी करतात. खास सहल आयोजित करुन असे तुरुंग पाहतात व सच्च्या देशभक्तांच्या स्मÀतींना तिथे जाऊन वंदन करतात.  नवी मुंबईतील तळोजा तुरुंग हे देश स्वतंत्र झाल्यानंतर तेथे गुन्हेगार, आरोपी, सजा भोगायला आलेले अशांना ठेवण्याचे ठिकाण आहे. ते काही प्रेक्षणीय स्थळ नव्हे, की तिथे तुम्ही आम्ही भेटी देऊन त्या वास्तूचे अवलोकन करावे, ती वास्तू नजरेत साठवावी. तिथे विविध श्रेणीतल्या कैद्यांना ठेवले जाते. सचिन वाझे, अरुण गवळी, गजा मारणे, आबू सालेम, लेपटनंट कर्नल पुरोहित या व अशा ‘नामी’ मंडळींनी या तळोजा जेलचा पाहुणचार घतला आहे. तर ते असो!  केवळ तुरुंग वा तुरुंगवास एवढाच काही आजच्या लेखाचा विषय नव्हे!

३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात भडकाऊ भाषण देणे, १ जानेवारी २०१८ च्या भीमा-कोरेगावच्या हिंसेला कारणीभूत ठरणे आदि आरोपांवरुन सजा भोगत असलेले, काश्मिरमध्ये सैन्य ठेवण्यास विरोध असलेले भारतीय मानवाधिकार कार्यकते, पत्रकार गौतम नवलखा (वय ७० वषे) हे डाव्या, माओवादी विचारांचे वगैरे मानले जातात..ते २८ ऑगस्ट  २०२० पासून तळोजा तुरुंगात ‘सरकारी पाहुणचार’ घत आहेत. तळोजाच्या तुरुंग प्रशासनाने गौतम नवलखा यांना त्यांचा जुना चश्मा चोरीला गेल्यावर कुटुंबियांनी पाठवलेला नवा चश्मा सुरक्षेच्या नावाखाली नाकारला, मग खुर्ची मिळावी ही मागणी नाकारली, त्यानंतर आता सुप्रसिध्द लेखक पी जी वुडहाऊस यांचे पुस्तक कुटुंबियांनी  पाठवले..तर तेही सुरक्षेचे कारण देत नाकारले आहे. यावरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने तळोजा तुरुंग प्रशासनाची ही भूमिका हास्यास्पद असल्याचे ताशेरे ओढले आहेत. कारणे काहीही असोत..पण यावरुन पुस्तकाचे महत्व किती अनन्यसाधारण आहे हे मात्र अधोरेखित झाले आहे.

मला आठवले..आपल्या काही स्वातंत्र्यसैनिकांनी अशा पुस्तकांचा वापर ती मधल्या बाजूने कोरुन काढत त्यातून पिस्तुले व तत्सम शस्त्रास्त्र पाठवण्यासाठी केल्याचे आपल्या इतिहासाच्या पुस्तकांतून नमूद केले आहे. आणखी एका ठिकाणी मी वाचले की भारतावर सत्ता गाजवणाऱ्या ब्रिटीशांच्या एका अधिकाऱ्याला वाचण्यासाठी एक पुस्तक पाठवण्यात आले होते, ज्याची पाने काहीशी एकमेकांना चिकटवलेल्या अवस्थेत मुद्दाम ठेवण्यात आली होती. हे पुस्तक वाचताना बोटांना थुंकी लावून ही पाने मोकळी करण्याच्या नादात त्या पानांना  हेतूपूर्वक लावण्यात आलेले विष त्या अधिकाऱ्याच्या ताेंडावाटे पोटात जाऊन त्याचा मÀत्यु ओढवतो. निर्जिव वाटणारे पुस्तक हे असे जीवघणे-सायलेन्ट किलर  ठरले होते. या छापील पुस्तकांना फार मोठा इतिहास आहे. भारताबद्दल म्हणायचे झाल्यास त्यावेळच्या प्राचीन ऋषीमुनींना असलेले ज्ञान पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्यासाठी ते मुखोद्गत करणे एवढेच एकमेव साधन होते. पण २४०० वर्षांपूर्वी भारतात कागदाचा शोध लागला होता.  तेंव्हा ताडाच्या पानांवरही लिहिले जात असे. १५५६ च्या सुमारास भारतात कागदावर छपाई सुरु झाली, तर चीनमध्ये ८६८ साली कागद छपाईला प्रारंभ झाला होता. मी व तुम्ही आम्ही ज्या छापील कत्तपत्रसÀष्टीचे घटक व वाचक आहोत, त्या कत्तपत्र छपाईची सुरुवात जरी  उशिरा झालेली असली तरी तिची मुळे इतकी पुरातन आहेत, ही बाब अंगावर कित्येक मुठी मांंस चढवणारी आहे. एकेकाळी मुखोद्गत करुन ठेवलेले, एकाने दुसऱ्याला सांगितलेले, कालांतराने लिहून ठेवलेले रामायण, महाभारत, भगवद्गीता, बायबल, कुराण, गुुरुग्रंथसाहिब, बौध्दधर्मीय सूत्र, जैनांचे समयसार, पारशांचा झेंद अवेस्ता हे सारे विविध धर्मियांना पूज्य, प्रातःस्मरणीय असे ग्रंथ-पुस्तकेच तर आहेत. छपाई, पुस्तकबांधणी, संग्राह्यता आदि वैशिष्ट्यंामुळे हे सारे ग्रंथबध्द ज्ञान, माहिती, मार्गदर्शन पुढच्या पिढ्यांर्पयंत सहज संक्रमित होत, उपलब्ध होत गेले.

पत्रकार, लेखक, सामाजिक कार्यकर्ता, संशोधक, विद्यार्थी, शिक्षक, कलावंत, सÀजनशील व्यक्ती या साऱ्यांसाठी पुस्तकांचा सहवास हे परमसुख असते..असावे! एक उदाहरण देतो...आत्महत्या करायला गेलेल्या एका म्हातारीच्या हाती शेवटचे काही लिहून ठेवण्यासाठी एक कागद सापडला. त्यावरचे ती वाचायला लागली तर तो कागद म्हणजे पु. ल. देशपांडे यांच्या विनोदी पुस्तकाचे पान होते. ते वाचून म्हातारी खळखळून हसली. तिला जगण्यासाठी बळ मिळाले व तिने आत्महत्येचा विचार सोडून दिला. असे हे पुस्तक तुमच्या आमच्या जीवनातही सातत्याने मोलाची भूमिका बजावत असते. पु. ल. देशपांडे यांचे आवडते लेखक पी जी वुडहाऊस. नेमके त्यांचेच पुस्तक गौतम नवलखांना तळोजा जेलमध्ये पाठवण्यात आले तेंव्हा ते नाकारले गेले हे त्या पुस्तकाचे विशेष मोल! 

मी तर म्हणतो की पुस्तक हे केवळ एक माध्यम आहे. साधन आहे. त्यात काय विचार मांडले आहेत हे महत्वाचे! तुरुंग अधिकाऱ्यांनी त्या पुस्तकाची नीट तपासणी करुन, पूर्णपणे वाचून ते गौतम नवलखा यांना द्यायला हवे होते. पुस्तक, कागद, लेखणी, शस्त्र, चित्रफित, गाणी, नाटक, सिनेमा, अन्य सादरीकरणे ही तर केवळ साधने-माध्यमे आहेत. सुरीने कांदा कापता येतो व एखाद्याची मानही! तिचा वापर कसा होतो हे बघावे! तोफांची सलामी देऊन देशभक्तांना वंदन करता येते व युक्रेनसारख्या ठिकाणी मानवी वस्त्यांवर तोफगोळे डागून स्त्रिया, मुले, कध्द, रुग्ण यांचे जीवही कसे घता येतात हेही आपण पहात आहोतच. राम आणि कृष्ण या हिंदु दैवतांची कठोर चिकित्सा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती, त्यावर आधारीत इंग्रजी ग्रंथ रिडल्स इन हिंदुईझम १९८६ च्या सुमारास सरकारी खर्चाने प्रसिध्द होणार होता. त्यावर दै. लोकसत्तेचे तत्कालिन संपादक स्व. माधवराव गडकरी यांनी एक लेख लिहिल्यावर सर्क्रिंचे लक्ष तिकडे गेले. या पुस्तकाच्या बाजूने त्यावेळी रामदास आठवले व बाकीच्या आंबेडकरवाद्यांनी लाखालाखांचे मोचे काढले. तर विरोधात शिवसेनेने तेवढेच मोठे मोचे काढून या पुस्तकाला विरोध दर्शवला होता. शेवटी ‘या पुस्तकात व्यक्त झालेल्या मतांशी सरकार सहमत नाही’ अशी तळटीप टाकण्याचा निर्णय रिपब्लिकन नेते तसेच शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे व त्यावेळचे मुख्यमंत्री स्व.शंकरराव चव्हाण यांनी एकत्र बसून घतला व मगच वाद निवळला. 

मला लेख, संपादकीय, मुलाखती, विशेष कत्त, संवाद, कविता, घोषवाक्ये हे सारे लिहायला आवडते. गेली अडतीस वर्षांहून अधिक काळ माझे लेखन विविध नामांकित वर्तमानपत्रांतून प्रसिध्द होत आहे. पण पुस्तक काढणे हे मात्र  खर्चाचे व जिकीरीचे काम असल्याने मी स्वतःचे आजवर एकच पुस्तक (‘अनोखी व्यक्तिमत्वं’ - तीन आकत्या) काढले. इतर लेखकांची तीन पुस्तके प्रकाशक म्हणून मी प्रसिध्द केली. तर ब्रेल लिपीत माझी एकोणीस पुस्तके मंडणगड (जि.रत्नागिरी) येथील स्नेहज्योती अंधशाळेने अंध विद्याथ्र्यांसाठी प्रकाशित केली आहेत. आजमितीस दिडशे-दोनशे पानांची  किमान पंधरा पुस्तके मराठीत एकाच वेळी काढू शकेन इतका मजकूर माझ्याकडे तयार आहे. बघु या कधी व कसा त्यावर पुस्तके काढण्याचा योग येतो ते! हा पुस्तकांवरील लेख लिहायला घताना माझ्या वाचनात आले की ‘नसेससाठी समाजशास्त्र’ हे पाठ्यपुस्तक टी के इंद्राणी यांनी लिहिले असून त्यात ‘हुंडा पध्दतीमुळे कुरुप दिसणाऱ्या मुलींचाही विवाह होऊ शकतो’ असे नमूद करत छुपेपणाने हुंड्याच्या प्रतिगामी पध्दतीचे जाहिर व छापील समर्थनच केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे या पुस्तकावर कारवाई करण्याची सूचना केली आहे.  

म्हणजे बघा!  पुस्तक कोणकोणत्या प्रकारे समाजाला कोणत्या दिशेला नेऊ शकते ते. पुस्तकासाठी लिहीणे, पुस्तक काढणे, पुस्तक वाचकांर्पयंत पोहचवणे, त्याचा सकारात्मक वापर होऊ देणे हे खरंच खायचे काम नाही! चांगली, समाजाला दिशा देणारी, वाचकांची ज्ञान-माहिती-मनोरंजन-प्रबोधनाची भूक भागवणारी पुस्तके लिहीणाऱ्या सर्क्रिंना मनापासून सलाम व २३ एप्रिल रोजी येणाऱ्या जागतिक पुस्तक दिनानिमित्त सर्क्रिंना शुभेच्छा..!! 

Read Previous

अक्षय (अक्षय्य) तृतीयेचे महत्त्व