वाढती महागाई अन्‌ लोकांची मानसिकता!

स्टेटसच्या नादी फार लागू नका बरे! तुमच्याकडे शिल्लक असलेली रक्कम अगदी अत्यावश्यक बाबीवरच खर्च करावी. कसोटीचा हा काळ सुद्धा जाईल आणि चांगले दिवस येतील. असा सकारात्मक विचार केल्यास या समस्येतून तुम्ही आपोआप बाहेर पडाल. आर्थिक स्थिती फार बिकट झाली असेल, तर नातलग अथवा मित्रांकडून मदत घ्या. तुमची मुले शाळा कॉलेजात जाणारी असतील, तर त्यांचे शिक्षण थांबवू नका. खासगी शाळेऐवजी सरकारी शाळेत त्यांना दाखल करण्याचा विचार करता येईल. त्यात चुकीचे काही नाही. आपल्या आर्थिक स्थितीला झेपेल तेच आपण करायला हवे. 

जवळपास गेल्या दोन अडीच वर्षापासून भारतासह जगातील लोकांना ‘कोरोना’या महामारीने ग्रासले होते. या काळात अनेकांना आपल्या असलेल्या नोकऱ्याही गमवाव्या लागल्या. त्यामुळे आर्थिक तंगीबरोबरच वाढत्या महागाईनेही लोकांच्या ताेंडचे पाणी पळवले.महामारीच्या फटक्यातून आता कुठे लोक सावरत असताना रशिया-युव्रÀेन युद्धामुळे महागाईच्या आगीत तेल ओतले गेले आहे. खाण्या-पिण्याच्या वस्तुंसह जगभरात अन्य वस्तूंचे दर सुद्धा वाढत आहेत. प्रत्यक्षात उत्पन्न वाढत नाही आणि दर मात्र भडकत असतात. ही जगरहाटी चालू असताना लोकांनी जगावे कसे असा प्रश्न लोकांना व खासकरÀन सर्वसामान्यांना पडला आहे. कशावर खर्च करावा आणि कोणता टाळावा, हे समजेनासे झाले आहे.
कोरोना महामारी चालू झाल्यापासून आपण कसोटीला सामोरे जात आहोत. संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सारख्या कठोर उपायांनाही सामोरे जावे लागले. देशाची व सामान्य माणसाची अर्थव्यवस्थेची गती मंदावली. सर्व उत्पादन प्रवि्रÀया थंडावल्यामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला. आता संसर्ग खूपच कमी होऊन दैनंदिन जीवन पूर्वपदावर येत असताना जागतिक स्तरावर मोठ्या घडामोडी घडून आल्या व अचानक रशियाने युव्रÀेनवर हल्ला केल्यामुळे पुन्हा बिकट स्थिती निर्माण होऊ लागली आहे. या स्थितीत महागाई वाढणे अटळ असले, तरी पुढे काय होणार, याचा काही अंदाज करता येत नाही. जगभरात खाण्या-पिण्याच्या वस्तुंसह अन्य वस्तुंचे दर गगनाला भिडायला लागले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर गÀहखर्चाचे बजेट सांभाळण्याचे आव्हान सर्वसामान्यांपुढे निर्माण झाले आहे; पण या सगळ्यांमागे केवळ महामारीच नाही. कोविडपूर्व काळातील (२०२० च्या आधी) काही वषे स्थिती फार चांगली नव्हती. चलनवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना आपल्या देशात नोटबंदी करण्यात आली, त्यानंतर ‘जी.एस.टी.’ लादण्यात आली असतांना अनेक छोटे-मोठे कारखाने, व्यापार, उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आले व ते बंद पडले देखील. परिणाम स्वरÀप आधीच असलेल्या बेकारीत वाढ झाली. त्यातून कुठे सावरत असतांनाच कोरोनाची साथ आली आणि त्याचे फटके बसायला लागले. या काळात अनेकांना रोजगार गमवावा लागला आणि नोकरीवर असलेल्यांना वेतनात कपात स्विकारावी लागली. त्यात भर पडली वाढत्या बेरोजगारीची. या सगळ्या कारणांमुळे गÀहखर्चाचे बजेट कोसळले. वर्तमान जीवन जगण्यासाठी लोकांना भविष्यासाठी साठवलेली पुंजी वापरावी लागली आणि ज्यांच्याकडे अशी बचत नव्हती, त्यांची स्थिती जास्तच वाईट आली. त्याचा परिणाम म्हणजे असे लोक आर्थिक पातळीवर आणखी खालच्या स्तराला गेले.
सर्वसामान्य स्थितीत जुन्या पिढीपेक्षा जास्त काही करण्याचा-मिळविण्याचा नव्या पिढीचा प्रयत्न असतो. पण आता असे दिसत नाही. अनेक विद्याथ्र्यांना प्राथमिक पातळीवर शिक्षण सोडावे लागले. आणखी एक परिणाम म्हणजे; चांगल्या संधी आयुष्याच्या शोधात शहरांकडे येणारे लोक आता गावीच राहणे पसंत करÀ लागले आहेत; पण तेथेही महागाईचे चटके टाळता येत नसल्याची स्थिती आहे. या विचित्र आणि अनिश्चित स्थितीत टिकून राहण्यासाठी काही उपाय करावे लागतील हे नक्की. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला अनमोल ठरेल. ते सांगतात की, नवीन करिअर किंवा आर्थिक प्रयोगासाठी सध्याचा काळ बरा नाही. त्यामुळे गुंतवणूक सावधगिरीने करायला हवी. तुमच्याकडे जी काही रक्कम असेल, ती तुम्हाला माहिती नसलेल्या पर्यायात गंुतवू नका. तुमचा जीवनविमा असेल, तर तो चालू ठेवा. कोरोना काळात सरकारने जनकल्याणाच्या अनेक योजना सुरÀ केल्या असून, त्याचा लाभ घता येईल. उदा. मोफत रेशन मिळण्याच्या योजनेत तुम्ही पात्र असाल, तर विनासंकोच ती मदत घ्यावी. घरातील खर्च चालविण्यासाठी कोणी आपणहून मदत करत असेल, तर ती सुद्धा घ्यावी.
तुमच्याकडे शिल्लक असलेली रक्कम अगदी अत्यावश्यक बाबीवरच खर्च करावी. कसोटीचा हा काळ सुद्धा जाईल आणि चांगले दिवस येतील. असा सकारात्मक विचार केल्यास या समस्येतून तुम्ही आपोआप बाहेर पडाल. आर्थिक स्थिती फार बिकट झाली असेल, तर नातलग अथवा मित्रांकडून मदत घ्या. तुमची मुले शाळा कॉलेजात जाणारी असतील, तर त्यांचे शिक्षण थांबवू नका. खासगी शाळेऐवजी सरकारी शाळेत त्यांना दाखल करण्याचा विचार करता येईल. त्यात चुकीचे काही नाही. आपल्या आर्थिक स्थितीला झेपेल तेच आपण करायला हवे. भाड्याच्या घरात राहत असाल तर घरमालकाबरोबर बोलून भाडे कमी करण्याचा प्रयत्न करा; पण त्याला ते मान्य नसेल, तर ते घर सोडून देऊन दुसरे लहान घर भाड्याने घता येऊ शकते. त्यामुळेही खर्चात बचत होऊ शकते. समजा तुम्ही कर्ज घऊन नवीन घर घतले असेल व तुमच्याकडे हप्ते भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर जोखीम कव्हर थोडी कमी करा. पण स्किम सोडू नका. आपली संपत्ती अथवा मालमत्ता विकण्याची घाई सध्या करÀ नका. त्याऐवजी तुम्हाला मदत करण्यास तयार असलेल्याकडून प्रसंगी उधार-उसनवार रक्कम घऊन खर्च करा. मासिक हप्ते (ई.एम.आय.) सुरÀ असतील तर त्याचा कालावधी वाढवून घ्या. त्यामुळे हप्त्याची रक्कम कमी होऊन तुमचे टेंशन कमी होताना दिसेल.
सरकारने जळावू इंधनात, विव्रÀी किंमत वाढ केल्यामुळे अनेक कुंटूंबाना गॅस सिलिंडर विकत घणे परवडत नसल्याने त्यांनी आपला पूर्वीचाच चुलीवर स्वयंपाक करण्याचा प्रकार सुरÀ केला आहे. जंगलातील लाकडे त्यांना फुकट मिळतात. त्याचा इंधन म्हणून वापर सुरु झाल्याने अनेकांना महागाईच्या या काळात थोडासा का होईना दिलासा मिळू लागला आहे. पण अशी उपाययोजना म्हणजे ‘दात कोरÀन पोट भरण्याचा प्रकार’ म्हणावा लागेल. याने मध्यमवर्गीयांची स्थिती दयनिय झाली आहे. गरज नसलेल्या खर्चामध्येच सध्या कपात करणे गरजेचे झाले आहे. यात घरांचे नुतनीकरण, वाढदिवस अथवा सणाच्या काळात नवीन कपड्यांची खरेदी वगैरे अनावश्यक खर्चात कपात करÀन तोच पैसा जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी वापरणे योग्य राहणार आहे. या महागाईने कापाेरेट जगतासह धनदांडग्याचे फारसे काही बिघडत नाही. कारण त्यांचा वाढता खर्च हा कंपन्याच्या वा माल उत्पादनाच्या खर्चातून केला जातो, जो उत्पादीत मालाच्या किंमतीत वाढीने तो पूरा केला जातो. त्याचा थेट परिणाम करदात्यांवर होतो. गोरगरीबांनाही त्याचा फारसा तोटा होत नाही, कारण त्यांच्या गरजा बऱ्याच प्रमाणात अल्प स्वरÀपांच्या असतात व त्यांना लोक काय म्हणतील याचीही पर्वा नसते. त्यात फक्त आणि फक्त पांढरपेशा वर्गावरच ताण पडतो. पांढरपेशा वर्गाची दशा ‘घर का ना घाट का’ अशी होत असते. मध्यमवर्गीय वा पांढरपेशा वर्गातील बहुतेक जण नोकरीधारकच असतात. त्यांचे उत्पन्न स्थिर असून महागाई मात्र अस्थिर असते. त्यातून आलेला पगार महिनाभर कसा पूरवायचा याची भ्रांत त्यांना असते.
सध्या सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांची चलती आहे. ते वाढत्या खर्चाची भरपाई वर कमाईतून करताना दिसतात. सर्वच सरकारी-निमसरकारी कर्मचारी वर कमाईवर भर देतात असे नव्हे. त्यातही इमानदार व स्वाभिमानी प्रकत्तीचे काहीजण आहेत. त्यांनाच आपले खर्चाचे बजेट सांभाळताना नाकीनउÀ येतात. या बाबतचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे. सकाळी सकाळी ओळखीच गÀहस्थ भेटले, ते म्हणाले देवाजवळ न्याय अजिबात नाही; देव अगदी अन्यायी आहे. मी म्हणालो, काय झाले एवढे! असं का म्हणता? ते म्हणाले, ‘मी नोकरीत कधी कोणाचे पाच पैसेही खाल्ले नाहीत. सर्क्रिंशी चांगला वागलो, प्रामाणिकपणे काम केले. तरीसुद्धा फक्त एक मजली घर आणि स्कुटरच घऊ शकलो. याउलट माझ्या हाताखाली काम करणाऱ्या साध्या कारकुनाने दुमजली घर घतले, कार घतली.
मी त्यांना विचारले, तुम्ही का नाही पैसा खाल्ला! ते म्हणाले, माझ्या मनाला ते पटत नाही. लोकांनी मला नावे ठेवली असती. मी म्हणालो हे तुम्हाला मान्य आहे का?  पण लोक त्या कारकुनाला नावे ठेवत नसतील असं तुम्हाला वाटत असेल, तर ते चूक आहे. तुम्ही फक्त त्याचे दुमजली घर, कार बघून स्वतःशी तुलना करता, बाकीची बाजू बघत नाही. तुम्हाला समाजात, सभ्य गÀहस्थ म्हणून ओळखतात, 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आंबा