पामबीच मार्गावर अक्षर चौकात बीएमडब्ल्यू कारला अपघात

नवी मुंबई : पामबीच मार्गावर नेरुळ येथून सीबीडीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव बीएमडब्ल्यू कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदरची कार सीवूड्स येथील अक्षर चौकातील रस्ता दुभाजकावर चढल्याची घटना बुधवारी रात्री घडली. सुदैवाने या अपघातात  कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही. मात्र या अपघातामुळे बीएमडब्ल्यु कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले असून एनआरआय पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.  

या घटनेतील बीएमडब्ल्यु कार चालक हा बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास नेरुळ येथून पामबीच मार्गे सीवूड्स येथे जात होता. तेथुन तो कार मालकाला घेऊन सातारा येथे जाणार होता. मात्र यावेळी भरधाव बीएमडब्ल्यू कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदरची कार पामबीच मार्गावरील अक्षर चौकात डाव्या बाजुला असलेल्या रस्ता दुभाजकावर चढली. सुदैवाने कार चालक या अपघातातून बचावला. त्यानंतर कार चालकाने कार त्याच ठिकाणी सोडून त्याठिकाणावरुन पलायन केले. या अपघातामुळे सदर चौकात काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच सीवूड्स वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त बीएमडब्ल्यु कार बाजुला काढली. त्यानंतर एनआरआय पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नवी मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष अशोक गावडे यांच्यावर गुन्हा दाखल