नवी मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष अशोक गावडे यांच्यावर गुन्हा दाखल 

नवी मुंबई-:राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या बाबतीत राष्ट्रवादी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांनी गुरूवारी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याचा भाजप तर्फे निषेध करत अशोक गावडे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजप तर्फे करण्यात आली असून तसे निवेदन वाशी पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.त्यानंतर वाशी पोलिसांनी अशोक गावडे यांच्यावर कलम५०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेविरोधात राज्यभर राजकारण तापले असताना नवी मुंबईतही याचे पडसाद उमटू लागले आहेत.

राज्याघे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉंड्रिंग प्रकरणी बुधवारी ईडीने अटक केली असून सत्र न्यायालयाने  त्यांना ३ मार्च पर्यत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीने मलिकांवर कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या अटकेच्या कारवाईचा निषेध ठिकठिकाणी केला. होता.नवी मुंबईत देखील महावीकास आघाडीतर्फे वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत शुक्रवारी घोषणांसह जोरदार आंदोलन केले. यावेळी भाषण करताना नवी मुंबई राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे यांनी विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या बाबतीत एकदम खालच्या स्तरावर जात आक्षेपार्ह वक्तव्य केले. सदर वक्तव्यामुळे भाजप खुपच आक्रमक झाली असून अशोक गावडे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप तर्फे शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी वाशी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन केली आहे. यावेळी माजी खासदार डॉ.संजीव नाईक, माजी आमदार संदिप नाईक, माजी महापौर सागर नाईक, दशरथ भगत, नेत्रा शिर्के,मंगल घरत तसेच मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी उपस्थित होते.तर या प्रकरणी अशोक गावडे तसेच आमदार शशिकांत शिंदे यांनी आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे.तर या प्रकरणी वाशी पोलिसांनी अशोक गावडे यांच्यावर कलम ५०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

डॉ.आंबेडकर स्मारक आग प्रकरणी संबंधित अभियंता, ठेकेदारावर कारवाईची मागणी