महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
बोगस खबऱ्यांच्या जीवावर अतिक्रमण बांधकामांना अभय ?
नवी मुंबई-: मनपा प्रशासनाकडून न्यायालयीन दणक्या नंतर अनधिकृत इमल्यांवर कारवाईचा फार्स उरकला जात आहे.अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी बोगस खबऱ्यांना हाताशी धरून सरसकट वसुलीचा धंदा जोरात सुरू असल्याची कुजबुज सुरू आहे.यामध्ये अनधिकृत बांधकामांची जबाबदारी निश्चित करून दिलेल्या अधिकाऱ्यांनीच आपल्या ताफ्यात बोगस खबरी रुजू करून घेत कारवाईच्या नावाखाली लुबाडण्याचा नवीन मार्ग अवलंबला आहे.
सुनियोजित शहर अशी बिरुदावली अभिमानाने मिरवणाऱ्या नवी मुंबई शहरात अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीवर बिनधास्त अनधिकृत बांधकाम सुरू आहेत.या बांधकामांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी बोगस खबऱ्यांची टोळी कार्यरत असून ही टोळी अधिकाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने तक्रार अर्ज देते.या अर्जावर तातडीने कारवाई करण्यासाठी तत्पर अधिकारी मोजमाप करण्यास जातात तक्रार आल्याने कारवाई करणे भाग आहे असा दम भरून या बांधकामधारकांना मधला मार्ग सुचवून कारवाई पुढे ढकलण्याची खेळी रचली जात असल्याची चर्चा अतिक्रमण विभागात सुरू आहे.
अतिक्रमण विभागात वर्णी लावण्यासाठी अधिकाऱ्यांची जोरदार स्पर्धा सुरू असते. वरिष्ठांच्या आशीर्वादाने अतिक्रमण विभागात अभियंते आणि अधीक्षक वसुलीच्या मागे लागले आहेत .अतिक्रमण विभागात विभाग कार्यालयात बोगस खबरीलाल गराडा घालून बसत आहेत.अनधिकृत बांधकाम सुरू झाल्यावर पन्नास टक्के बांधकाम पूर्ण झाल्यावर हे खबरी या बांधकामा विरोधात तक्रार करतात.या तक्रारीवर कर्तव्य दक्ष अतिक्रमण विभाग अभियंते आणि वसुली अधिकारी एम आर टी पी नोटीस घेवून सबंधित व्यक्तीला दम भरतात.या प्रशासकीय कामकाजात प्रावीण्य संपादन केलेले वसुली अधिकारी कडक भाषेत काय'द्याची भाषा करतात.अतिक्रमण विभागात स्थलांतरित रोहित पक्षाप्रमाणे हे अधिकारी खाडीकिनारी असलेल्या बांधकामावर आपले खाद्य व भक्ष्य शोधून झाल्यावर थातुर मातुर कारवाई देखील करतात नाममात्र हातोडा मारल्यावर पुन्हा अनधिकृत बांधकामांना पेव फुटते.मात्र हे कथित खबरे अर्थ पूर्ण कारवाई झाल्यावर पुन्हा दुसऱ्या सावज शोधात असतात.
लक्ष्मी दर्शन आणि वास्तुशांती याच आधारावर अतिक्रमण विरोधी पथकात गोरख धंदा सुरू असल्याची चर्चा सामान्य नागरिक करत आहेत. अत्यंत सुशील तत्वाने वावरणारे हे खबरे अधिकाऱ्यांशी संगनमत करत आहेत.जोडीला युट्युबच्या कथित प्रतिनिधींना सोबत घेवून पत्रकारांच्या धमकी दिली जाते.अधिकारी,बोगस खबरे आणि यू ट्युब समाजमाध्यम कथित माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या टोळक्याने अतिक्रमण केलेल्या नागरिकांना भीती घालण्याचा नवाच उद्योग सुरू केला आहे.
नावाला गुन्हे दाखल करून हे अधिकारी प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी व्यवस्थित नेपथ्य रचना करत आहेत. त्यामुळे अतिक्रमण झालेल्या बांधकामात तक्रारीचे कागदी घोडे नाचवत अथवा माहिती अधिकारात माहिती मागवून समाजसेवक म्हणून मिरवणारे बोगस तक्रारदार देखील अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने अधिक फायदा उचलत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुऊ आहे.