फळ बाजारात देवगडच्या हापुसची आवक सुरू

नवी मुंबई -:वाशीतील कृषी उत्पन्न  बाजार समितीच्या फळ बाजारात कमी अधिक प्रमाणात  हापुस दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. याआधी बाजारात जानेवारीत हापुसचा आगाप माल दाखल झाला होता. त्यानंतर सोमवारी देवगड हापूसच्या १८ पेटी आंबा दाखल झाला असून प्रति डझनला २ हजार ते ३ हजार  रुपये बाजारभाव  मिळत आहे.सध्या तुरळक प्रमाणात जरी हापुस दाखल होत असला तरी हापूसचा खरा हंगाम एप्रिल महिण्यात जोर धरणार मत व्यापाऱ्यांनी  व्यक्त केले.

       डिसेंबर महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात अंजीर, स्ट्रॉबेरी, फळांचा हंगाम सुरु होतो.तर जानेवारी मध्ये तुरळक प्रमानात आंबा येत असतो.  यंदा पडलेल्या अवकाळी पावसाने सुरुवातीचे मोहोर लागलेली फळधारणा प्रक्रियेत असणारे हापूस मोहोर गळून पडला तर काही हापूसला भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे यंदा हंगाम उशिरा ने सुरू होणार असल्याचे मत व्यापारी  व्यक्त करत आहेत. तसेच यंदा मागील वर्षीच्या तुलनेत  उत्पादनकमी होणार असून ६०%-६५% उत्पादन होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.सध्या बाजारात देवगडच्या ५ ते ६ डझनच्या १८ पेट्यादाखल झाल्या आहेत. सध्या बाजारात देवगडच्या प्रतिडझन  हापुसला १५०० ते२०००रु बाजारभाव आहेत. एप्रिल मध्ये हापूसची जादा आवक सुरू होईल, ते मे पर्यंत मोठ्या प्रमाणावर हापूस उपलब्ध होईल अशी माहिती व्यापारी आणि फळ बाजार संचालक संजय पानसरे यांनी दिली आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पनवेल तहसील कडून खारघर मध्ये गौण खनिज पथकाची स्थापना