ऐरोली व बेलापूर विभागातील अनधिकृत फेरिवाल्यांवर धडक कारवाई

 नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका ‌घणसोली विभाग कार्यालय क्षेत्रातील घर नं.902, मरीआई मंदिरा जवळ, गोठीवली या ठिकाणी विनापरवानगी अनधिकृतपणे आरसीसी तळमजला बांधकाम पूर्ण करून पहिल्या मजल्याचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे निदर्शनास आले होते. नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. या अनधिकृत बांधकामास घणसोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतू त्यांनी सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.

      सदर अनधिकृत बांधकामावर घणसोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होतेत्यानुसार सदर अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आलेले आहे. या धडक मोहिमेसाठी घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, मजूर-10ब्रेकर-2, गॅस कटर-1 तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.

      त्याचप्रमाणे ऐरोली विभाग कार्यालय अंतर्गत सेक्टर 04 व 05, ऐरोली तसेच यादवनगर येथे अनधिकृतपणे रस्ते व फुटपाथवर  फेरीवाला व्यवसाय सुरु होते. या अनधिकृत फेरीवाल्यांवर ऐरोली विभागामार्फत फेरीवाला हटाव मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले असून एकूण 05 हातगाडी, नाशीवंत भाजापाला, गॅसशेगडी, 01 गॅस सिलेंडर व इतर सामान जप्त करण्यात आले असून क्षेपणभूमी येथे जमा करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी 04 मजूर, 2 पिकअप व्हॅन कारवाई करीता वापरण्यात आले. सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त, जी विभाग ऐरोली यांचे मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता (अतिक्रमण)  व  अतिक्रमण विभागातील अधिकारी / कर्मचारी, सुरक्षारक्षक व अतिक्रमण विभागाचे पोलीस पथक यांचेमार्फत करण्यात आली.

तसेच बेलापूर विभागामार्फत अतिक्रमण मोहिमेतंर्गत बेलापूर गाव येथील 1 हातगाडी सीबीडी से-11 येथे – 1 हातगाडी, व सिवूड परिसरातील 2 हातगाडी असे 4 हातगाड्या तसेच अंदाजे 52 फेरीवाले यांचे विरूध्द कारवाई करून त्यांचे भाजीपाला/फळे व इतर सामान जप्त करून कोपरखैरणे क्षेपणभूमी येथे जमा करण्यात आले.

      सदर कारवाई करतेवेळी या धडक मोहिमेसाठी बेलापूर विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, 18 मजूर, 1 मुकादम, 1 पीकअप व्हॅन, 1 ट्रक तसेच अतिक्रमण विभागाकडील मोठे वाहन व अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक  तैनात होते.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पालिकेच्या क्लीन मार्शल कडून खारघरमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई