मुशाफिरी  

मुशाफिरी विषयाला धरुन आणि सोडून..!

     गुणवत्तेला, कलेला, वेदनेला जात नसते किंवा धर्मही नसतो. म्हणून वेदनेचा विषय जिथे निघतो तिथे संवेदनशील व्यक्ती हळव्या होतात. पण ‘काश्मिर फाईल्स सिनेमा मध्यंतरानंतर कंटाळवाणा आहे ’असे वास्तवात घडलेल्या घटनांच्या चित्रीकरणाबाबत जबाबदार व्यक्तीने जाहीरपणा बोलावे, कर्नाटकातील हिजाबवादावर नोबेल पारितोषिक विजेत्या पाकिस्तानी मलाला युसुफझाईने भारतीय मुस्लिम महिलांची बाजू घ्यावी व काश्मिरी पंडित महिलांच्या व्यथा,वेदना, हाल, हत्याकांड, धर्मांतरे, विस्थापने यावर सोयीने गप्प रहावे हे विषयाला सोडून केलेले औचित्यभंगाचे वर्तन नव्हे काय?

     दोन वषे करोना महामारीमुळे होऊ न शकलेल्या १८ व्या  महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पधेच्या नवी मुंबई केंद्रातील प्राथमिक फेरीच्या उद्‌घाटन सोहळ्याचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याचा योग २० मार्च रोजी आला होता. जगाच्या रंगभूमीवर पाऊल ठेवताना आई आपल्याला अभिनयाचा, नाटकाचा आधार घऊनच एकेक गोष्ट शिकवत असते. बालनाट्य त्यासाठी महत्वाची. अनेक गोष्टी त्या नकळत्या-कळत्या वयात समजून जातात. या स्पधेच्या तिसऱ्या दिवशी सादर केल्या जाणाऱ्या एका बालनाट्याच्या सुरुवातीच्या उद्‌घोषणेत मी ऐकले की तिथे ‘गानकोकिळा भारतरत्न’ लता मंगेशकर व ‘अनाथांची माय’ पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना विनम्र अभिवादन करुन शब्दपुष्पांनी श्रध्दांजली वाहण्यात आली. आणखी काही नावे घतात का हे मी पहात होतो. पण ही दोनच नावे घतली गेली. वास्तविक पाहता ही दोन नावे डोंगराएवढी मोठी व अत्यंत कतÀर्त्ववान व्यक्तिमत्वांची आहेतच; पण रंगभूमी, नाटक, अभिनय यांचा विचार करता याच काळात हे जग सोडून गेलेल्या ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे नाव त्या रंगभूमीवर घतले जाणे औचित्याचे व विषयाला धरुन ठरले असते. पण तसे झाले नाही.
     तसे पाहिले तर सारे जग हेच मुळी विसंगतीने, विषयाला सोडून वागण्याने, औचित्यभंगाचे वर्तन करणाऱ्यांच्या दांडगाईने भरलेले आहे असे वाटावे असे अवतीभवतीचे वातावरण आहे. १९४७ पूर्वी हा देश भारत, पाकिस्तान, बांगला देशासह एकच एक भूप्रदेश होता व त्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या आयुष्याची होळी केली. भगतसिंग, राज्‌गुरु, सुखदेव यांनी इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केल्याच्या आरोपावरुन त्यांना २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आले.  त्यावेळच्या भारतातील काही गद्दारांनी या क्रांतीकारकांची माहिती ब्रिटीश सरकारला दिली. त्याबद्दल काहींना त्यावेळचे रोख २० हजार रुपये, काहींना ५० एकर जमिन तर काहींना ब्रिटनमध्ये ब्रिटीश सरकारच्या खर्चाने शिकायची लालूच दाखवली गेली व ते गद्दार त्याला बळी पडले व त्यांनी या आपल्याच देशाच्या क्रांतीकारकांची गुप्त माहिती देऊन स्वतः माफीचे साक्षीदार बनले. फाळणीनंतर धर्माच्या नावाखाली पाकिस्तान वेगळा झाला. १९७१ ला बांगला देशही पाकिस्तानपासून वेगळा झाला. भगतसिंग व त्यावेळच्या हिंदु-मुस्लिम-शीख-ख्रिस्ती-जैन अशा सर्वधर्मीय देशभक्तांनी अविभक्त भारतासाठी आपल्या घरादारावर नांगर फिरवून घतला व ऐन तारुण्यात फासावर चढले, ब्रिटीश पोलीसांच्या अत्याचाराला बळी पडले. पण १९४७ नंतरच्या पाकिस्तानात भगतसिंगांचे नाव घतले जात नव्हते. ते औचित्य, ते विषयाला धरुन सुसंगतीने वागणे यावर्षी पाकिस्तानात घडल्याचे दिसून आले. यंदा २३ मार्चला पाकिस्तानच्या ज्या लाहोर तुरुंगात भगतसिंगांना फाशी देण्यात आले त्या तुरुंगासमोर पाकिस्तानी नागरिकांनी ‘भगतसिंग जिंदाबाद, भगतसिंग अमर रहे’ च्या घोषणा दिल्या. यावेळी त्यांच्या हातात पाकिस्तानचे झेंडे होते खरे; पण आताच्या भारतातल्या एका क्रांतीकारकासाठी त्यांच्या डोळ्यांत अश्रूही होते. हे व्याकुळ वाचका..नव्या पिढीतील अनेकांना वाटते की हा देश आपोआपच स्वतंत्र झाला. सारे काही आपसूकच मिळाले. म्हणजे नुसती मौजमस्ती, सुखासीन जगणे, भौतिक सुखवादाच्या आहारी जाणे, सध्याच्या नेतेमंडळींचे एकमेकांवरील लाखो-कोटींचे आरोप, त्यांच्या भ्रष्टाचाराच्या, अटकेच्या, अटक झाल्यावर लगेच छातीत दुखु लागल्याच्या, जामीनाच्या, जेलमध्ये घरचे जेवण, गादी, पंखा दिला जाण्याच्या बातम्या बघणे म्हणजेच सारे काही. या देशासाठी अनेकांनी आयुष्याची राखरांगोळी केली आहे. एकमेकांना रंग लावताना, पाडव्याच्या, नवरात्रीच्या, गणेशोत्सवाच्या व अन्य सणांच्या मिरवणुकीत, शोभा यात्रांत नाचताना याचे कधीकाळी स्मरण झाले तर अश्रुंना जरुर वाट मोकळी करुन दे. ते औचित्याचे ठरेल.

     असे विषयाला सोडल्याचे, औचित्यभंगाचेे उत्तम उदाहरण म्हणून शासनयंत्रणांचे विविध निर्णय सांगता येतील. तुमच्या आमच्या दैनंदिन दळणवळणाचा एक भाग म्हणजे सार्वजनिक वाहतुक सेवा, परिवहन उपक्रम होय. त्यातही उपनगरी रेल्वे ही सर्क्रिंना परवडणारी, स्वस्त व सुरक्षित आणि जलद वाहतुक यंत्रणा. या रेल्वेत उपनगरी एसी लोकल चालवा म्हणून कोणतेही आंदोलन झाले नाही, मोचे निघाले नाहीत, रेल रोको झाले नाही; तरीही मध्य, पश्विम व हार्बर मार्गांवर या वातानुकुलीत गाड्या चालवल्या जाताहेत. त्यामुळे अन्य सर्वसामान्य (विना एसी) गाड्यांचे वेळापत्रक कोलमडत आहे. या एसी गाड्यांचे काही डबे रिकामे राहताहेत. या गाडीचे काही डबे एसी ठेवा व अन्य डबे साधारण ठेवा, याचे तिकिट तरी कमी करण्याच्या मागण्या  प्रवासी संघाने केल्या आहेत. रेल्वे स्टेशनवरील तिकिट देणाऱ्या मशिन्स करोनापूर्वीप्रमाणे चालू करा, रेल्वे स्टेशन परिसरातील खासगी तिकिट केंद्रे पुन्हा सुरु करायला परवानग्या द्या अशा मागण्या करुनही यातले काहीएक होत नाही. नवी मुंबई ते मुंबई ही अत्यंत महागडी जलवाहतुक सेवा गाजावाजा करत सुरु झाली. ओला आणि उबेर टॅक्सीनेही जे अंतर दोन-अडीचशे रुपयात (तेही थेट गंतव्य स्थानार्पयंत) सहज पार करता येते तिथे या जलवाहतुकीचे भाडे वारेमाप ठेवले आहे. रेल्वेने व  बसने जे अंतर वीस रुपयात कापता येते तिथे एवढे पैसे कोण कशाला भरील? केवळ मासिक किंवा वार्षिक किंवा पाहुणे आल्यावर दाखवण्यापुरती पर्यटन सेवा अथवा श्रीमंतांनाच परवडेल अशीच ही जलवाहतुक होऊन बसली आहे. हा औचित्याचा भंग, विषय सोडून सेवा देणे आणि जनसामान्यांच्या पैशांचाही अपव्ययच नाही का?


     आणि आता ‘दि कश्मिर फाईल्स’! हा सिनेमा नेमका झुंड, पावनखिंड हे सिनेमे येण्याच्या काळात आला आहे. त्याचे वेळेचे औचित्य काय हे  ते ते निर्माते, वितरक जाणोत. या सिनेमांवरुन उच्चवर्णिय असे काश्मिरी पंडित ब्राह्मण, मागासवर्गीय व ओबीसी असे त्यांच्या त्यांच्या रसिक-चाहत्या वर्गात गट तट पडल्याचे वातावरण देशात आहे.. जे पुरेपुर औचित्यभंगाचे व एकाच देशातल्या नागरिकांसाठी धोक्याचेही आहे. एकाच देशातील विविध समाजगटांच्या भावना केंद्रस्थानी असणाऱ्या चित्रपटांवरुन देशातल्या देशात जणू मानसिक फाळणी होऊ घातली आहे व एका समाजगटाला दुसऱ्या समाजगटाचे दुःख, वेदना, यातना, भावना, क्लेष, नरसंहार यांचे काहीही वाटू नये याचे पुरावे ‘दि काश्मिर फाईल्स’विरोधात काही समाजगटांकडून चालवल्या जाणाऱ्या समाजमाध्यमी मोहिमांवरुन स्पष्टच दिसून येत आहे. म्हणजे तत्कालिन केंद्र सरकार, काश्मिरातले प्रशासन, त्यावेळचे सारेच राजकीय पक्ष यांनी या नÀशंस हत्याकांडाला, स्थलांतराला, विस्थापनाला हलक्याने तर घतलेच; पण आता इतक्या वर्षांनी त्यावर सिनेमा येऊन त्यात काही मांडण्याचा प्रयत्न केला जातोय; तर एरवी सौम्यप्रकृती, मोजूनमापून, समतोल बोलण्यासाठी प्रसिध्द असलेल्या महाराष्ट्राच्या  एका मंत्र्यानेही ‘हा चित्रपट मध्यंतरानंतर कंटाळवाणा झाला आहे, चित्रपटाच्या कमाईतील १५० कोटींपैकी काही रक्कम काश्मिरी पंडितांच्या घरांसाठी दान करायला सांगा’ असे विषयाशी अत्यंत असंबध्द, चीड आणणारे उद्‌गार भर विधानसभेत काढून वास्तवात भारताच्या एका राज्यात घडलेल्या हत्याकांडाबद्दल त्या समाजाच्या वेदनांवर जणू मीठच चोळले आहे. जिचा देश पाकिस्तान आहे व तेथील महिलांच्या समस्यांवर ती आंदोलने करते म्हणून तिच्यावर गोळीबार केला गेला, देशाबाहेर पळवून लावण्यात आले, तिची हत्या करणाऱ्याला इनाम जाहिर करण्यात आले.. ती ‘शांततेचे नोबेल पारितोषिक विजेती’ मलाला युसुफझाईसुध्दा इकडे कर्नाटकात हिजाबवाद पेटला तर  हिजाब परिधान करण्यासाठी आंदोलने करणाऱ्या भारतीय मुस्लिम महिलांची बाजू घते, पण ती एक महिला असूनही काश्मिरातील पंडित परिवारामधील महिलांचे बलात्कार, विनयभंग, हत्या, धर्मांतरे, स्थलांतरे याबद्दल मात्र सोयीस्कर गप्पच राहते.. याला आंधळी धर्मासक्ती, औचित्यभंग नाहीतर दुसरे काय म्हणावे? बघा दुसरा काही शब्द सुचतो का ते!.... 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

वाढती महागाई अन्‌ लोकांची मानसिकता!