हीरक महोत्सवी मराठी विज्ञान परिषद
मराठीतून विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तसेच समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाढ व्हावी व समाज विज्ञान साक्षर व्हावा यासाठी झटणारी संस्था म्हणजे मराठी विज्ञान परिषद (मविप). मविपची स्थापना म.ना. गोगटे यांनी २४ एप्रिल १९६६ रोजी केली. यंदा २४ एप्रिल रोजी या संस्थेला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. एखादी संस्था इतके वर्षे टिकून राहते याचा अर्थ त्यांचे उद्दिष्ट समाजपयोगी असते आणि प्रामाणिक व दीर्घ काळ काम करणारे कार्यकर्ते लाभलेले असतात आणि म्हणूनच संस्थेलाही दीर्घायुष्य लाभू शकते. मराठी विज्ञान परिषदेच्या स्थापनेत म.ना.गोगटे यांच्याबरोबर डॉ. रा.वि. साठे, प्रा. प.म.बर्वे, श्री. ज.ग. बोधे, डॉ. म.आ. रानडे, प्रा. रा.वि. सोवनी होते. प्रत्येक अध्यक्षांनी भरभराटीसाठी काही ना काही भरीव कार्य केले म्हणूनच संस्था मुंबईत जरी स्थापन झाली तरी वर्षभरातच पुणे, ठाणे, नाशिक, सांगली, गोवा अशा ठिकाणी तिच्या शाखा निर्माण झाल्या.
आज या शाखांना विभाग म्हटले जाते व त्यांची एकूण संख्या ६७ आहे. परिषद स्वयंसेवी संस्था असून ती धर्मादाय आयुक्तांकडे नोंदलेली आहे. तिला कोणतेही सरकारी निर्वाह अनुदान मिळत नसून ती स्वतःच्या पायावर उभी आहे. तिचे स्वतःचे मुंबईत दुमजली विज्ञान भवन आहे. मराठी विज्ञान परिषदेने पहिल्याच वर्षी वार्षिक अधिवेशन घ्यायला सुरुवात केली. अधिवेशन दरवर्षी नियमाने घेत राहिल्याने त्यांनीही नुकतीच साठ वर्षे पूर्ण केली. त्याच वर्षी परिषदेने विभागांशी संपर्क राहावा म्हणून मुखपत्र सुरु केले.
यथावकाश त्याचे रुपांतर "मराठी विज्ञान परिषदपत्रिके" त झाले. मविप पत्रिकेनेही आता ५८ वर्षे पूर्ण केली असून आतापर्यंत ६३३ अंक प्रकाशित झाले आहेत. विज्ञान साहित्याला वाहिलेले एक सृष्टीज्ञान (९७ वे वर्ष) मासिक सोडले तर इतका मोठा पल्ला केवळ पत्रिकेने गाठला असे म्हणायला हरकत नाही. यावरून आपण असे म्हणू या का की समाज वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारत आहे.
विज्ञान विषयावर भाषणे आयोजित करणे, विज्ञान विषयक लेख वर्तमानपत्रात लिहिणे, शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रयोगाचे, शंका समाधानाचे, अनुवाद शिबिराचे, लैंगिक शिक्षणाचे, गच्चीवरच्या बगीच्याचे, छोटीछोटी पुस्तके छापण्याचे, संशोधनाकडे वळा, विज्ञानकथा स्पर्धा, लोकसत्तेतील २१ वर्षे सातत्त्याने चाललेले,9कुतूहल” सदर असे अनेक कार्यक्रम केले.परिषदेकडे एक अद्ययावत वाचनालय असून त्यात हजारोनी संदर्भ ग्रंथ आहेत, एक छोटेखानी प्रयोगशाळा असून शाळेतील विद्यार्थी इथे येवून आवश्यक ते प्रयोग करतात. परिषदेला अध्यक्षांची एक प्रभावळ लाभली. त्यात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू असलेले डॉ. रा.वि. साठे, स्वतः म.ना. गोगटे, प्रा. भा.मा. उदगावकर, प्रा. जयंत नारळीकर, डॉ. वसंत गोवारीकर, प्रभाकर देवधर आणि सध्या प्रा. जे.बी.जोशी आहेत. प्रा जे.बी.जोशी यांनी परिषदेत पी.एच.डीचा कार्यक्रम, विज्ञान एकांकिका स्पर्धा महाविद्यालयातील आणि विद्यापीठातील प्राध्यापकांना अध्यापनाबरोबर संशोधन करण्यासाठी एकेक लाख रुपयांचे एम.एम. शर्मा पुरस्कार, परिषदेतर्फे नामवंत संशोधकांना दोन लाख पन्नास हजार रुपयांचे दरवर्षी दोन दोन जीवनगौरव पुरस्कार, शालेय विद्यार्थ्यांना प्रयोग पाहता यावेत म्हणून शनिवारी विज्ञानवारी कार्यक्रम, दूरदर्शनवर विज्ञान मालिका आणि प्रयोगशाळा साहाय्यकांसाठी कार्यशाळा हे सारे सुरु केले. नुकताच त्यांनी नवनिर्मिती प्रयोगशाळा हा कार्यक्रम नेहरू विज्ञान केंद्राच्या मदतीने सुरु केला. संस्था सातत्याने नवनवीन कार्यक्रम करीत असून शतक पूर्ण करण्याच्या उमेदीत आहे.
मविपचा एक विभाग नवी मुंबईत आहे. मध्यवर्तीप्रमाणेच हा विभागही अनेक कार्यक्रम करत आहे. फरक एवढाच की या विभागाला स्वतःची अशी जागा नाही. साहित्य मंदिरच्या मदतीने हा विभाग कार्यकरतो. विभागाने प्रथम काही वर्षे सर्व सामान्यांसाठी भाषणे, कृतिसत्रे, एकांकिका, चर्चासत्रे असे विविध विषयावर कार्यक्रम केले; परंतु श्रोते, प्रेक्षक यांचा पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्याने विभागाने आपला मोर्चा शालेय विद्यार्थ्याकडे वळवला आणि त्यांच्यासाठी शाळेतच जावून कार्यक्रम करायला सुरूवात केली आणि हा पर्याय खूपच यशस्वी ठरला. अगोदर महापालिकेच्या शाळांमधून अनेक कार्यक्रम केले. ३५० विद्यार्थ्यांना नेहरू विज्ञान केंद्र दाखवण्यात आले. ७-८ शाळांना विज्ञानविषयक दहा पुस्तकांचा संच भेट दिला. विज्ञान दिन, गणित दिन, पर्यावरण दिन, आरोग्य दिन, जागतिक हवामान दिन सारखे प्रासंगिक कार्यक्रम विविध शाळांमधून करत आहोत. मॉडर्न हायस्कूल, नवी मुंबई हायस्कूल, रा.फ. नाईक शाळा, माध्यमिक हायस्कूल ऐरोली, विवेकानंद हायस्कूल सानपाडा, चार्टर्ड इंग्लीश स्कूल-ऐरोली तसेच इतर चार पाच शाळांमधून हे कार्यक्रम सदोदित होत आहेत.नेरुळच्या विद्या भवन शाळेच्या मदतीने नवी मुंबई विभागाने एक अनोखी आंतरशालेय विज्ञान वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात नवी मुंबईतील सुमारे ५६ शाळांतील ८० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पर्धा मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून आयोजित केली गेली होती. प्रथमच हा प्रयोग होता; पण शाळा व विद्यार्थ्यांनी कमी कालावधीत छान प्रतिसाद दिला त्यामुळे अशी स्पर्धा दरवर्षी भरण्याचे ठरवले आहे. शहरी शेतीसारखे कार्यक्रम आयोजित केले, गेली आठ वर्षे सातत्याने मविप मध्यवर्तीची विज्ञान एकांकिका स्पर्धा साहित्य मंदिरमध्ये मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळच्या मदतीने भरवत आहोत.
डिसेंबर २०२३ मध्ये मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळच्या सहकार्याने साहित्य मंदिर सभागृहात परिषदेचे २०२३ चे ५८वे अखिल भारतिय अधिवेशन विभागाने भरवले होते. प्राज उद्योग समुहाचे अध्यक्ष डॉ प्रमोद चौधरी या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर नवी मुंबई महापालिकेचे त्या वेळचे आयुक्त राजेश नार्वेकर हे उद्घाटक होते. डॉ अनिल काकोडकर खास आग्रहास्तव व मविपच्या प्रेमापोटी अधिवेशनास उपस्थित होते. त्यांच्या हस्ते डॉ सुरेश हावरे लिखीत "माय डेज ॲट बीएआरसी” पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. यात सुमारे ५०० वैज्ञानिक व विज्ञान प्रसारकांनी भाग घेतला होता. विशेष म्हणजे या अधिवेशनाला पद्म पुरस्काराने सन्मानित ६ निमंत्रित वैज्ञानिक आवर्जून आले. त्यामुळे नवी मुंबई करांनाव्यासपीठावर वैज्ञानिक प्रत्यक्ष बोलतांना पहायला मिळाले. एवढेच नव्हे तर अनेकांना त्यांच्याशी वार्तालाप करताआला. या अधिवेशनातील अनेक विषयांनी सुद्धा अनेकांना अधिवेशनाकडे खेचून आणले.
परिसंवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्य काळ, सायबर क्राईम व त्यातून सुटका, कांदळवन व त्यातील जीवसृष्टी तसेच विंचवाच्या विषावरील लस.
या प्रसंगी एक स्मरणिका प्रकाशित करण्यात आली होती. विषय सारे नवी मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे होते. उदा. नवी मुंबईचा विकास आराखडा, नवी मुंबईतील वाहतूक - रस्ते, लोकल रेल्वे, मेट्रो आणि जलसेवा, नवी मुंबईतील घनकचरा व्यवस्थापन, नवी मुंबईतील उद्याने व वृक्षराजी, नवी मुंबईतील पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि निसर्ग उद्यान, नवी मुंबईतील खारफूटी वन, सागरी जैवविविधता आणि केंद्र, नवी मुंबईतील उद्योग, नवी मुंबईतील दिव्यांगासाठी शिक्षण, प्रशिक्षण ईटीसी सुविधा, नवी मुंबईतील मैदाने व स्टेडीयम, २१व्या शतकातील नवी मुंबई आयटी (हब) केंद्र, नवी मुंबईच्या वैज्ञानिक चळवळीत साहित्य संस्कृती व कला मंडळाचे योगदान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान आणि नवी मुंबई आणि नवी मुंबईतील कर्करोगावरील संशोधन व आधुनिक उपचार केंद्र - ॲक्ट्रेक. एक दिवसाचे विज्ञान संम्मेलन २२ फेब्रुवारी २०२४ साली साहित्य मंदिर इथे घ्ोण्यात आले. सुमारे ३००विज्ञानप्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित होते. यात अन्न व औषध प्रशासन व सामाजिक बांधिलकी, चला उद्योजक बनू या, या कार्यक्रमात डॉ. सुरेश हावरे, अशोक खाड्ये आणि रविंद्र नेने या उद्योजकांनी मार्गदर्शन केले. मौखिक आरोग्य हा एक वेगळा विषय डॉ. उल्हास वाघ यांनी हाताळला, बरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्य तसेच उर्जा क्षेत्र भारतापुढील आव्हाने असे दोन परिसंवाद आयोजित केले होते. 9संशोधनाकडे वळा” विषयावर भाषणे शाळा व महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. गणिताविषयी विद्यार्थ्यांमध्ये भीती असते ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने काही विशेष व्याख्यानांचेआयोजनही मविप नवी मुंबई विभागातर्फे करण्यात आले. दोन्ही उपक्रमांबद्दल आलेला प्रतिसाद उत्साहवर्धक असाच होता.
नुकतेच विद्या भवन शाळेच्या मदतीने इयत्ता ८-९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर आयोजीत करण्यात आले होते. त्यात विज्ञान विषयक घडामोडींचा आढावा मनोरंजक शैलीत सादर करण्यात आला. त्याचबरोबर मुलांनी काही विज्ञान विषयक प्रयोग स्वतः केले व विज्ञानाची तत्वे जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी स्वतः काही खेळणी बनवली व त्या मागील विज्ञान समजून घेतले. विज्ञान प्रसारात तज्ञ व्यक्तींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. - डॉ. किशोर कुलकर्णी - अध्यक्ष : मराठी विज्ञान परिषद - नवी मुंबई विभाग