प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
कविता डॉट कॉमच्या वतीने परिचय एका कवीचा
कविता डॉट कॉमच्या वतीने
परिचय एका कवीचा ( सौजन्य - दै. आपलं नवे शहर)
हरिविजय आबाजी पवळे (श्रीहरी पवळे )
शिक्षण - कलाविषयातील ACD, AMGD आर्ट (सी अँड एम )पदवी
लेखक, कवी, चित्रकार, नाटककार, रांगोळीकार, कथाकथनकार, अक्षरलेखनकार म्हणून कार्यरत
विनामूल्य बालनाट्य कार्यशाळा चालवतात. अनेक पुरस्कार प्राप्त, चारोळीसंग्रह प्रकाशित
रांगोळीत वर्ल्ड रेकॉर्ड, नाट्यफलक लेखन वर्ल्ड रेकॉर्ड
कोपरखैरणे, नवी मुंबई
रांगोळी
भल्या पहाटे सुगंध हा दरवळला
सूर्यनारायणही आतुरला स्वागताला
माय माऊलींचे सडासंमार्जन प्रहरी
तुलसी वृंदावन नक्षी स्वस्तिक दारी
रंग रंगाचा खेळ हा असा
खेळ खेळती सोबती जसा
ठिपक्यांनी माऊली जोडते नाती
नात्यात दुरावा नको गाऊन गाती
दिसणं जरी आमचं वेगळं असतं
दुरावा ना करी नातं आमचं ते कसलं
हा माझा तो तुझा नसतो दुजाभाव
सांज आरतीला जमतो सारा गाव
लक्ष्मीच्या रूपाने सजले भूअलंकरण
भक्तीरूपात गाते भूपाळी ते भजन
मंदिर घर सांजवेळी तेथे पणती तेवती
जरी वेगळी कांती जपली आम्ही नाती
-श्रीहरी पवळे