धनलक्ष्मी बँकेच्या शाखा व्यवस्थापका विरोधात कारवाईची मागणी

नवी मुंबई-:मराठी राज भाषेचा अवमान करणाऱ्या वाशी येथील धनलक्ष्मी बँक लिमिटेड या बँकेच्या शाखा व्यवस्थापका विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे सहकार सेनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे.

वाशी येथील धनलक्ष्मी बँक लिमिटेड येथील शाखा व्यवस्थापक यांनी उपोषणाला बसलेल्या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी मराठी भाषेत लिहिलेले निवेदन घेण्यास नकार दिला. केरळ राज्यातुन येऊन महाराष्ट्र राज्यात व्यवसाय करून मराठी भाषेचा द्वेष करत असल्याचे या प्रकरणातून ही निदर्शनास येत असल्याचे जाणवते आहे. बँकेमध्ये खातेदार हे जास्त मराठी भाषिक असून सदर व्यवस्थापणाने मराठी कर्मचारी यांची नेमणूक करावी. जेणे करून भविष्यात अश्या घटना घडणार नाहीत. तर मागील अनेक वर्षे महाराष्ट्र राज्यात केरळ मधील धनलक्ष्मी बँक लिमिटेड नावाने असणारी बँक व्यवसाय करत असून राज भाषा विरोधी ही मुजोरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि सहन करणार नाही. असा इशारा बाळासाहेब शिंदे यांनी दिला असून सदर बँकेवर राजभाषेचा अवमान केल्या प्रकरणी बँक व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी शिंदे यांनी मुख्यमंत्री यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अच्युत पालव यांच्या सुलेखनातून शब्दाक्षरे झाली बोलकी