प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
नवी मुंबईची वाटचाल दिल्लीच्या धर्तीवर
नवी मुंबईत चटई क्षेत्र वाढवून मिळाले आहे. यामुळे जुन्या इमारती तोडणे किंवा नवीन उंच इमारती बांधल्या जात आहेत. नवी मुंबई आता उभी वाढत आहे. यामुळे धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, वाढणार आहे. यावर कडक निर्बंध असणे अत्यावश्यक आहे. पलेमिंगोचे कृत्रिम पुतळे उभारण्या व्यतिरिक्त नवी मुंबईतील वन्य जीवन, निसर्ग जपण्याकरिता, वृद्धिगत करण्याकरिता कोणतीही पाऊले उचलली दिसत नाहीत. शहर सुरक्षित, स्वच्छ ठेवण्याकरता नवी मुंबईतील लोकसंख्येवर आत्ता नियंत्रण आणण्याची वेळ आली आहे.
हो, नवी मुंबईतील प्रदूषणाच्या निर्देशांकांची दिल्लीच्या प्रदूषणाच्या आकड्यांकडे वाटचाल सुरू आहे. प्रदूषणाचे निर्देशांक आता धोक्याची पातळी ओलांडू लागले आहेत. यामुळे श्वसन प्रणाली आजारांच्या रुग्णांनचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कबुतरांचा मुद्दा तर बाजूलाच राहिलाय.
नवी मुंबई महानगर पालिका हद्दीत आता मतदान तर झाले आहे. त्यामुळे गटार, मीटरच्या पुढे जाऊन विचार करायला हवा. सुज्ञ, जागरूक नागरिकांनी प्रशासनाला सद्य आणि भविष्यात भेडसावू पाहणाऱ्या गंभीर प्रश्नांनवर विचार करण्यास भाग पाडायला हवे आहे. नुसते ऐकू नका, ऐकवा, हीच ती वेळ हीच ती संधी. फरक पडत नसतो, फरक पडण्यास भाग पडावे लागते. नाहीतर You will get what you deserve.
नवी मुंबईत चटई क्षेत्र वाढवून मिळाले आहे. यामुळे जुन्या इमारती तोडणे किंवा नवीन उंच इमारती बांधल्या जात आहेत. नवी मुंबई आता उभी वाढत आहे. यामुळे धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, वाढणार आहे. यावर कडक निर्बंध असणे अत्यावश्यक आहे. गाड्यांचे संख्या वेगाने वाढत आहे, त्याचबरोबर गाड्यामुळे होणारे प्रदूषणही वाढत आहे. पार्किंगची समस्या सर्वांना भेडसावत आहे, पार्किंगमुळे नेहमीच वाद होताना दिसतात. कचरा जाळून निर्माण होणार धूर प्रदूषणात आणखी भर घालतो. काही वेळा तर नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता कामगारच कचरा जाळताना दिसतात.
मुख्य रस्ते स्वच्छ दिसतात. परंतु शहरातील आतील भागात अस्वच्छता दिसून येते. हीच अस्वच्छता मलेरिया, डेंगू इ आजारांना निमंत्रण देते. दरवर्षी त्याच भिंती रंगवायला करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा, शहर स्वच्छ करण्याकरिता आधुनिक पद्धती वापरायला हव्यात. प्लास्टिकच्या वापरावर कुणाचेही नियंत्रण दिसत नाही. भेट देताना कापडी पिशव्या भेट द्या.
नवी मुंबईत थोडेच तलाव, खाड्या शिल्लक आहेत. हे तलाव स्वच्छ, कचरा, प्लास्टिक मुक्त असायला हवेत. नवी मुंबईतील पश्चिमेकडील डोंगर उजाड होत चालले आहेत, हे डोंगर हिरवे नक्कीच करता येतील. मियावाकीसारखी वृक्ष लागवड अधिक प्रमाणात करायला हवी. तलाव, खाड्या, समुद्र स्वच्छ ठेवण्याकरता उपाययोजना करायला हवी. नवी मूंबईला पलेमिंगो सिटी म्हणताना, पलेमिंगोचे कृत्रिम पुतळे उभारण्याव्यतिरिक्त नवी मुंबईतील वन्य जीवन, निसर्ग जपण्याकरिता, वृद्धिगत करण्याकरिता कोणतीही पाऊले उचलली दिसत नाहीत. शहर सुरक्षित, स्वच्छ ठेवण्याकरता नवी मुंबईतील लोकसंख्येवर आत्ता नियंत्रण आणण्याची वेळा आली आहे. आम्हाला हवे आहेत प्रदूषण रहित, स्वच्छ, निसर्ग वन्य जीवन संपन्न, व्यायामाकरिता चालण्याकरिता पुरेसे वॉकिंग ट्रॅक, स्वच्छ तलाव, बगीचे, हिरवीगार डोंगर असलेली नवी मुंबई.
एक सुज्ञ नागरिक
-डॉ.अरुण कुऱ्हे