मनपाच्या वास्तूत राजकीय दादागिरी

नवी मुंबई  --:सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात सांस्कृतिक कार्यक्रम करता यावे  म्हणून  नवी मुंबई महानगर पालिकेने सभागृह बांधले आहेत. मात्र या सभागृहाना आपली खाजगी मालमत्ता असल्या प्रमाणे काही राजकारणी दादागिरी करत असल्याचा प्रत्यय  कोपरखैरणेतील कै अण्णासाहेब पाटील बहुउद्देशीय सभागृहात आला आहे. त्यामुळे सदर प्रकरणी कारवाई करावी म्हणून आगरी कोळी युथ फाऊंडेशनच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न समारंभ आदी कार्यक्रमासाठी सर्व सामान्य नागरिकांना परवडेल असे कोपरखैराणे सेक्टर ५ येथे काही वर्षांपूर्वी मनपाने बहुउद्देशीय सभागृह बांधले. या ठिकाणी देखभाल दुरुस्तीचे कंत्राट माजी नगरसेवकाच्या  नातेवाईकांना  दिले गेले आहे. तर सभागृहात कार्यक्रम वेळी मंडप, जेवण याची जबाबदारी सभागृह भाड्याने घेणा-या संबंधित व्यक्तीची असते. मात्र, सदर काम आम्हालाच द्या अशी एकाधिकाशाही पद्धत माजी नगरसेवकाचे कार्यकर्ते अवलंबितात. असा आरोप करीत आगरी कोळी युथ फाउंडेशनचे ऐरोली अध्यक्ष संदीप पाटील यांनी मनपा कडे तक्रार केली आहे. या संस्थेच्या एका सदस्याने  २२ मे राेजी सदर सभागृह भाड्याने घेतले होते. सकाळी कार्यक्रम असल्याने आदल्या दिवशी रात्री स्वयंपाकाचे साहित्य ठेवायचे होते. मात्र त्याला मज्जाव करण्यात आला त्यावेळी येथील सुरक्षा रक्षकही त्यांचीच बाजू घेत त्यांनाच कंत्राट देऊन टाका असे सुचवले जात होते . त्यावेळी थेट मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला समज दिली व साहित्य आत ठेवण्यास मुभा दिली. अशी माहिती संदीप पाटील यांनी दिली. या बाबत संबंधित व्यक्तीने आगरी कोळी फाउंडेशनकडे तक्रार केली होती अशा तक्रारी वारंवार येत असल्याने सदर कंत्राटदारांवर कारवाई करावी म्हणून फाउंडेशनच्या वतीने मनपाला तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक आणि त्यांच्या सहकार्यावर कारवाई करावी आणि सर्व सामान्य लोकांची येथे होणारी पिळवणूक थांबवावी अशी विनंती करण्यात आली आहे.अशी माहिती ऐरोली अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली. याबाबत कोपरखैरणे विभाग अधिकारी प्रशांत गावडे यांच्या सोबत संपर्क साधला असता प्रतीसाद लाभला नाही.

कोपरखैरणेतील कै अण्णासाहेब पाटील बहुउद्देशीय सभागृहात  माजी नगरसेवकाचा नातेवाईक असलेला सदर कंत्राटदार मागील काही दिवसांपासून दादागिरी करत नागरिकांची अडवणूक करत असलाच्या  तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे सदर प्रक्ररणी मनपाने कारवाई करावी म्हणून आम्ही तक्रार केली आहे. - संदीप पाटील. अध्यक्ष, ऐरोली विधान सभा क्षेत्र, आगरी कोळी युथ फाउंडेशन.

मनपाची वास्तू ही कंत्राटदाराला देखभाल दुरुस्तीसाठी दिलेले असताना सभागृह भाड्याने घेणाऱ्या व्यक्तीने कंत्राटदार यांचेच  साहित्य घ्यावे म्हणून दबाव टाकत आडकाठी आणत असतो. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई न केल्यास आम्ही आंदोलन करू. - मधुकर मुकादम, माजी नगरसेवक.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कांठीवली भक्त निवासावरील कारवाईमुळे बंजारा समाजाचे संत आक्रमक