रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबीर 

पनवेल : माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार दिनांक ३० मे रोजी खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविदयालय येथे महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभणार आहे.
           
महिलांमध्ये आढळणारा लठ्ठपणाची तपासणी, आयुर्वेदिक उपचार व आहार- विहार विषयक तज्ञ् डॉ. जाई केणी यांचे मार्गदर्शन महिलांना मिळणार आहे. दुपारी २ ते सायंकाळी ४ पर्यंत हे शिबीर होणार असून आरोग्याच्या दृष्टिकोनातून या शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा व पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी केले आहे. 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मनपाच्या वास्तूत राजकीय दादागिरी