पालिका आयुक्त कडून खारघर मधील पावसाळी कामाची पाहणी  

खारघर : खारघर वसाहतीत  पनवेल महानगरपालिका प्रशासनांकडून  सुरु असलेल्या कामाची पाहणी पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी बुधवारी केली. तसेच नाले,गटारे साफसफाईची कामे योग्य प्रकारे करण्यात यावे अश्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी उपायुक्त सचिन पवार, सहायक आयुक्त वैभव विधाते, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी आदी उपस्थित होते. 

         खारघर वसाहत सिडकोकडून पनवेल पालिकेकडे  हस्तांतरण करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेने  एजन्सीची नेमणूक करून पावसाळा पूर्वी केली आहेत. दरवर्षी सिडकोकडून मे अखेरीस निविदा काढून सेक्टर निहाय ठेकेदाराची नेमणूक करून पावसाळी कामे केली जात असत, मात्र या वर्षी पालिकेने पालिका हद्दीतील नोड साठी स्वतंत्र् एजन्सीची नेमणुक केली आहे. विशेषतः खारघर डोंगरावर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास डोंगरातून पावसाचे पाणी वाहून नेणारा सेक्टर बारा मधून अकरा मार्गे खाडीत जाणारा नाला पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असतो. दोन वर्षांपूर्वी सदर नाल्याची बांध फुटून पावसाचे पाणी  सायन पनवेल महामार्गावर आले होते.  त्यामुळे रस्त्यावर चिखल झाला होता  तसेच पाणी तुंबल्याने काही वाहने बंद पडल्याची घटना घडल्या होत्या. त्यामुळे यावेळी  पालिका आयुक्तांनी यावेळी खारघर सेक्टर अकरा लगतचा नाला आणि खारघर सेक्टर दोन लिटिल मॉल्स लगत असलेल्या नाल्याची पाहणी केली. पावसाळी कामे योग्य प्रकारे व्हावीत अशा सूचना  केल्या. 

चौकट -   खारघर हिरानंदानी पुलाकडून कोपरा गावाकडे  सायन पनवेल महामार्ग लगत असलेल्या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक टाकण्यात आले होते. या विषयी सिडकोकडे लेखी पत्र देवूनही कोणत्याही प्रकारची उपाय योजना केली नाही. स्थानिक नगरसेविका आरती नवघरे यांनी पालिका प्रशासनाकडे पत्र व्यवहार केल्यावर पालिकेने सदर नाल्याची साफसफाई केल्यामुळे सेक्टर दोन आणि आठ मधील नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. - वैभव विधाते 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिलांसाठी मोफत आरोग्य मार्गदर्शन शिबीर